BJP-MNS alliance | भाजप-मनसे युतीची पुन्हा चर्चा; मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या सदिच्छा भेटीने नाना तर्कवितर्क…!

राज्यात येत्या काळातली सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची. येथे सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने सर्वस्व पणाला लावले आहे. दोन्ही पक्षातले आरोप-प्रत्यारोप आणि खेळींनी टोक गाठले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीची चर्चा रंगतेय हे विशेष.

BJP-MNS alliance | भाजप-मनसे युतीची पुन्हा चर्चा; मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या सदिच्छा भेटीने नाना तर्कवितर्क...!
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 10:09 AM

रत्नागिरीः गोव्याच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पडद्यामागून भारतीय जनता पक्षाला (BJP) साथ दिली का? महाराष्ट्रात अजूनही भाजप आणि मनसे एकत्र येणार का, असे प्रश्न उपस्थित होतायत. त्याला कारण म्हणजे मनसेचे सरचिटणीस आणि मनसे कामगार युनियनचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतलेली सदिच्छा भेट. तसेच येत्या काळात गोव्यातील काही मंत्र्यांची स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हे पाहता नाही-नाही म्हणत असले, तरी महाराष्ट्रात पुन्हा एक नवी युती उदयास येणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने तडाखेबंद खेळी केली. 40 पैकी 20 जागांवर विजय मिळवला. भाजपने निवडणूक काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रभारी केले. फडणवीसांनी जे पर्रिकर आणि गडकरी यांना जमले नाही, ते करून दाखवले, असे त्यांचे कौतुक झाले. त्यानंतर आता नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोर धरतेय.

अन् युतीची चर्चा सुरू…

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मनसेचे सरचिटणीस आणि मनसे कामगार युनियनचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी घेतलेली सदिच्छा भेट पुन्हा एकदा चर्चेत आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार का, याची चर्चा पुन्हा रंगते आहे. खरे तर यापू्र्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून युतीची शक्यता फेटाळली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही युतीची चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. मात्र, या दोन्ही पक्षांचे नाही, नाही म्हणजे हो का, असा अर्थही लावला जातोय.

मुंबई महापालिका महत्त्वाची

राज्यात येत्या काळातली सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची. येथे सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने सर्वस्व पणाला लावले आहे. दोन्ही पक्षातले आरोप-प्रत्यारोप आणि खेळींनी टोक गाठले आहे. या मुंबई महापालिकेसह राज्यातल्या इतर निवडणुकांसाठीही गोव्याचा निकाल फडणवीसांचा आणि पर्यायाने भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा असा आहे. याचा आत्मविश्वासाचा कितपत फायदा भाजपला होतो, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.