AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीकेसीतील रेल्वे स्थानक फायलीतून गायब ! बिल्डर्सच्या भल्यासाठी एमएमआरडीएने केली जनतेची कोंडी

मुंबई : एमएमआरडीएने ( MMRDA ) बीकेसीतील ( BKC ) रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव रद्द केला आहे. केवळ खाजगी विकासकास फायदा मिळवून देण्यासाठी आधी बीकेसीत येथे रेल्वे स्थानक होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर हे स्थानक मेट्रोने जोडण्याची खोटी माहिती पसरवित त्या जागेचे भाव वाढविण्यास मदत केली. त्यानंतर स्थानकाची काही गरज नसल्याचे सांगत प्रस्ताव रद्द केले. या […]

बीकेसीतील रेल्वे स्थानक फायलीतून गायब ! बिल्डर्सच्या भल्यासाठी एमएमआरडीएने केली जनतेची कोंडी
bkcImage Credit source: social media
| Updated on: Dec 05, 2022 | 8:23 PM
Share

मुंबई : एमएमआरडीएने ( MMRDA ) बीकेसीतील ( BKC ) रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव रद्द केला आहे. केवळ खाजगी विकासकास फायदा मिळवून देण्यासाठी आधी बीकेसीत येथे रेल्वे स्थानक होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर हे स्थानक मेट्रोने जोडण्याची खोटी माहिती पसरवित त्या जागेचे भाव वाढविण्यास मदत केली. त्यानंतर स्थानकाची काही गरज नसल्याचे सांगत प्रस्ताव रद्द केले.

या प्रकरणात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मुंबईकर आणि सरकारची एकप्रकारे फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बीकेसीत रेल्वे स्थानक बांधण्याचे पुन्हा प्लानिंग करावे अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली आहे.

बीकेसी रेल्वे मार्गाचे आरेखन आणि ई आणि जी ब्लॉकमधील रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी एमएमआरडीएने दि. 22 फेब्रुवारी 2011 रोजी नोटीस प्रकाशित करीत बीकेसी रेल्वे मार्गाचे आरेखन आणि ई आणि जी ब्लॉकमधील रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव रद्द केल्याचे म्हटले आहे.

अनिल गलगली यांनी दि. 14 मार्च 2011 रोजी गलगली यांनी प्रमुख नगर व क्षेत्र नियोजन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे लेखी हरकत सादर केली. त्यावर सुनावणी झाली. सोमवार दि. 30 मे 2010 रोजी एमएमआरडीए कार्यालयात पी. आर. के.मूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली. पीआरके मूर्ती, डी.संपतकुमार आणि पी.जी.गोडबोले यांच्या नियोजन समितीने शासनाला अहवाल पाठवित तीन शिफारशी केल्या.

बीकेसी रेल्वे मार्गाचे आरेखन हटविणे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या ई आणि जी ब्लॉकमधील प्रस्तावित रेल्वे स्थानकासाठीच्या जमीनीचा दर्जा बदलून ती वाणिज्यिक करणे. ट्रॅक्शन सब स्टेशनसाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ड्राईव्ह-इन-थिएटरच्या दक्षिण-पूर्व भागातील 4210 मीटर भूखंडाचा वापर ट्रॅक्शन सबस्टेशन ऐवजी वाणिज्यिक असे करणे अशा तीन शिफारसी केल्या आहेत.

नियोजन समितीने प्रस्तावित ( चारकोप-वांद्रे-मानखुर्द ) मेट्रो मार्ग वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधून जात आहे आणि वांद्रे – कुर्ल्याला जोडत असल्याचे कारण दिले आहे. तसेच  वांद्रे-कुर्ला रेल्वे लिंक अलाइनमेंटच्या अगदी जवळ आहे. जवळच्या दाेन रेल्वे मार्गांची आवश्यकता नसल्याचे कारण देत नियोजन समितीने मंजूर नियोजन प्रस्तावांमधून नवीन वांद्रे-कुर्ला रेल्वे आरेखन हटविण्याची शिफारस केली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा कोणलाही मार्ग अस्तित्वात नाही. हा प्रकल्प कमी खर्चिक आहे.आज कुर्ला आणि वांद्रे या दरम्यान वर्षाला तीन कोटीहून अधिक प्रवासी ये-जा करतात. हा मार्ग बांधल्यास दादर येथील गर्दीही कमी होईल आणि  प्रवाशांचा रोजचा त्रास वाचेल. भारतीय रेल्वे ही स्वस्त आणि किफायतशीर असून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ होईल. वेळोवेळी याबाबतीत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी मागणी सुद्धा केली असल्याचे गलगलींचे म्हणणे आहे.

सरकारने वांद्रे-कुर्ला रेल्वे जोडमार्गाच्या आरेखनास पसंती देत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता तर पश्चिम व मध्य रेल्वे जोडणारा रेल्वे मार्ग मुंबईकरांसाठी उपलब्ध होऊ शकला असता. आणि सध्या बीकेसीत कोलमडलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवीन पर्याय उपलब्ध झाला असता, परंतू खाजगी विकासकांना फायदा करून देण्यासाठी एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती पसरवून रेल्वे मार्गाचे आरेखन रद्द केल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.