AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Budget 2021 updates live : 39 हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही

आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) आज जाहीर झाला. यंदाचं बजेट 39 हजार 038 कोटींचं आहे.

BMC Budget 2021 updates live : 39 हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
| Updated on: Feb 03, 2021 | 3:06 PM
Share

BMC Budget 2021 updates live  मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) आज जाहीर होत आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BMC Budget कडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मुंबई महापालिकेनं यंदा 39 हजार 038 कोटींचं बजेट जाहीर केलं. मागील वर्षी बजेट 33 हजार 441 कोटी होतं, यंदा 16.74 टक्केने बजेट वाढवलं.

महापालिकेत सर्वात आधी शिक्षण विभागाचं बजेट सादर करण्यात आलं. शिक्षण विभागाचे  2945 कोटींचं बजेट जाहीर झालं. यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळांचं नामांतर करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. आता मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई पल्बिक स्कूल नावने ओळखल्या जातील.

मुंबई महापालिकेचा 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्प आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.  यंदा महसुली उत्पन्न 5876 कोटीने कमी झालं, कोविड संकटाचा महापालिकेच्या महसुली उत्पनावर मोठा परिणाम दिसून आला. पालिकेचे एकूण महसूली उत्पन्न ५८७६.१७ कोटींनी घटले.

बजेटमध्ये कोणत्या तरतुदी 

  • कोस्टल रोडसाठी यंदा 2 हजार कोटी रूपयांची तरतूद
  • गोरेगाव मुलूंड लिंक रोडसाठी १३०० कोटींची तरतूद
  • सरसकट मालमत्ता माफी नाही, फक्त सर्वसाधारण कर माफ करण्यात आला आहे, मागील वर्षी जशी करवसुली झाली तशी पुढील वर्षी केली जाईल
  • कोवीडच्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विभागासाठी ४७२८ कोटींचे बजेट. मागील वर्षी ५२२६ कोटींचे सुधारीत बजेट आरोग्यासाठी होते.
  • लॉकडाऊन मुळे बंद झालेले उद्योगधंदे, ५००स्क्वे. फुटाच्या घरांना मालमत्ता करातून दिलेली सूट यांमुळे मालमत्ता कर वसुली २२६८.५८ कोटींनी घटली
  • विकास नियोजन खात्याकडून मिळणारं उत्पन्न २६७९.५२ कोटींनी घटले, मुंबईतील अनेक तयार सदनिका विक्रीविना पडून आहेत, म्हाडाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाल्यानं बीएमसीच्या महसूली उत्पन्नाचे नुकसान
  • ५०० स्क्वे फुटाच्या घरांना मालमत्ता करात सरसकट माफी नाही, मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर माफ केल्याचे पुन्हा जाहीर, शिवसेनेच्या वचननाम्यात ५०० स्क्वे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीची घोषणा होती.

सेवा शुल्कांमध्ये सुधारणा

तिजोरीला लागलेली गळती रोखण्यासाठी महापालिका सेवा शुल्कांमध्ये सुधरणा करणार, वेगवेगळ्या सेवांचं शुल्क निश्चित करण्यासाठी सुल्क सुधारणा प्राधिकरण नियुक्त करणार

बेस्टला मदत

बेस्टला यंदा ७५० कोटी रूपयांची मदत महापालिका करणार

उत्पन्नाचे नवे स्त्रोत

तिजोरीला लागलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नाचे नवे स्त्रोत, नवीन इमारतींना परवानगी देताना आकारण्यात येणा-या छाननी शुल्कात वाढ होणार, छाननी शुल्क एफएसआयवर न आकारता इमारतीच्या बाजारभावानुसार असलेल्या किंमतीवर आकारले जाणार

नवीन इमारतींच्या बांधकामानंतर अग्नी आणि जीव संरक्षण उपाययोजनांची पाहणी आणि परवानगी मुंबई महापालिका देते. या शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. वर्षात 140 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहेत. विविध सेवा शुल्क सुधारणा केल्या जाणार

कोव्हिड योद्ध्यांना मदत

निधन झलेल्या कोविड योध्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख सानुग्रह सहाय्य देणार

सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री करण्यासाठी 96 कोटींची तरतूद

सायन, केईएम नायर रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेसाठी 8 ते 10 कोटी खर्च

क्षयरोग, एड्स, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यासाठी 2030 पर्यंत 100 टक्के लसीकरण

कोविड कळात कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रु भत्ता देण्यात आला. 31 डिसेंबर 2020 पर्यंत 417 कोटी खर्च आला

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांग यासंख्या व्यक्तींना घरातच आरोग्य सेवा देण्यासाठी ओपीडी ऑन व्हील योजनेअंतर्गत शहर, पूर्व, पशचिम उपनगरांमध्ये मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देणार

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक चाचण्या घरातच करण्यासाठी युनानी, आयुर्वेद औषधपद्धतीचा वापर करणार यासाठी 5 कोटींची तरतूद

सार्वजनिक वाहतुकीचे महत्व लक्षात घेता या अर्थसंकल्पात 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रम

संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता वाढावण्यासाठी नवीन इमारत बांधान्यासाठी निविदा प्रस्तावित

अग्निशमन दल

अग्निशमन सेवा शुल्क इमारतीच्या क्षेत्रफळावर आधारित अग्निशमन सेवा शुल्क लागू केले जाणार आहे. इमारतीला परवानगी देतेवेळी हे शुल्क लागू केले जाणार आहे.या प्रस्तावाला महापालिका आणि राज्य सरकारची परवानगी मिळालेली आहे. परंतु अजून अधिसूचना जारी झालेली नाही. महापालिकेला त्यातून 20 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

मुंबई महापालिका शिक्षण अर्थसंकल्प (BMC Education Budget)

  • शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांच्याकडे सहआयुक्त रमेश पवार यांनी बजेट सादर केलं.
  • मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे 2021 आणि 2022 चा वार्षिक बजेट जाहीर :
  • शिक्षण विभागाचे  2945 कोटींचं बजेट जाहीर
  • मागील वर्षी 2944 कोटींचे बजेट मांडला होता
  • शिक्षण विभागात नवीन योजना
  • शाळांमध्ये कोविड 19 आरोग्य विषयक अत्यावश्यक साधनांचा पुरवठा 15 कोटी
  • शाळांमध्ये आता सॅनिटायझर , साबण विद्यार्थ्यांना दिलं जाणार
  • मुंबई महापालिकेच्या शाळांचं नवीन नामांतरण – आता पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जातील
  • प्राथमिक 963 तर माध्यमिक 224 शाळा मुंबई महापालिकेच्या नवीन 24 माध्यमिक शाळा सुरू होणार
  • मुंबई महापालिका दहा नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार , यासाठी 2 कोटी तरतूद , शहरात 2 , पश्चिम उपनगरात 3 , पूर्व उपनगरात 5 अश्या 10 शाळा असणार
  • खासगी शाळांना अनुदान – 380 कोटी
  • शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा – 88 कोटींची तरतूद
  • उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कॉन्सिलींग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार…
  • वैय्यक्तिक मार्गदर्शनासाठी मे २०२१ पासून `करिअर टेन लॅब´ या संस्थेमार्फत नियोजन…ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल –  २१.१० लाखांची तरतूद
  • महापालिका शाळेतील १३०० वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार – तरतूद २८.५८ कोटी

शिक्षण विभागाच्या बजेट कोणत्याही मोठ्या घोषणा नाहीत , जुन्याच योजनांना पुन्हा तरतूद करण्यात आलीय

 संबंधित बातम्या

मुंबईकरांवर कराचा बोजा नाही, महापालिकेचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर 

(BMC Budget 2021 updates live: : Brihanmumbai Municipal Corporation budget Key highlights shiv sena bjp maha vikas aaghadi )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.