घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर, अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश

मुंबईत घाटकोपरमध्ये एक भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घनेनंतर प्रशासनाला खळबळून जाग आलीय. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे देखील अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर, अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 9:56 PM

मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (१४ मे २०२४) दिले आहेत. घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली, त्याठिकाणी आयुक्त गगराणी यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून मदत कार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतांनाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या पाहणीप्रसंगी सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (विशेष) (प्रभारी) किरण दिघावकर, सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे उपस्थित होते.

“मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडा नगर येथील दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेले अन्य तीन अनधिकृत होर्डिंग्जवर देखील तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया भूषण गगराणी यांनी दिली.

सदर ठिकाणी महानगरपालिकेची विहित परवानगी न घेता जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली.

जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करून लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या जागेतील अनधिकृत जाहिरात फलक तसेच परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही यावेळी आयुक्त गगराणी यांनी अधोरेखित केलं.

Non Stop LIVE Update
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा.
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?.
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय.
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे.
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल.