मुंबईतील नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर ,80 टक्के पाण्याखाली जाईल, महापालिका आयुक्तांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

निसर्गाच्या इशाऱ्यानंतरही लोक जागरुक झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होईल. कफ परेड, नरीमन पॉईंट आमि मंत्रालय हा भाग 80 टक्के पाण्याखाली असेल म्हणजे गायब होईल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे.

मुंबईतील नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर ,80 टक्के पाण्याखाली जाईल, महापालिका आयुक्तांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
iqbal chahal
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 5:40 PM

मुंबई: पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अ‌ॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी मुंबईकरांना एक इशारा दिला आहे. वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन 2050 पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी गंभीर भविष्यवाणी केली आहे.

निसर्ग इशारे देतोय, गांभीर्यानं घेण्याची गरज

इकबाल चहल यांनी यावेळी निसर्ग आपल्याला वारंवार इशारे देत आहे. निसर्गाच्या इशाऱ्यानंतरही लोक जागरुक झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होईल. कफ परेड, नरीमन पॉईंट आमि मंत्रालय हा भाग 80 टक्के पाण्याखाली असेल म्हणजे गायब होईल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. आता ही फक्त 25 ते 30 वर्षांची बाब राहिली आहे कारण 2050 काही लांब राहिलेलं नाही. आपल्याला निसर्गाकडून वारंवार इशारे मिळत आहेत, आपण त्यावर काम केलं नाहीतर पुढील 25 वर्षात परिस्थिती गंभीर होईल. यामुळे पुढची नाही सध्याची पिढी देखील प्रभावित होईल, असं चहल यांनी सांगितलं.

दीड वर्षात तीन चक्रीवादळ

इकबाल चहल यांनी मुंबई हे दक्षिण आशियातील वातावरणीय बदलांबाबत अ‌ॅक्शन प्लॅन बनवण्यासाठी काम करणारं पहिलं शहर आहे. गेल्या 129 वर्षात पहिल्यांदा निसर्ग चक्रीवादळ धडकले. त्या पाठोपाठ गेल्या 15 महिन्यात तीन चक्रीवादळं आली. त्यामुळे 5 ऑगस्टला 2020 ला नरीमन पॉईंटला 5 ते 5.5 फूट पाणी साचलं होतं. इकबाल चहल म्हणाले त्यादिवशी चक्रीवादळाचा कोणताही इशारा नव्हता मात्र चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली होती. वातावरणीय बदलांमुळे 17 मे रोजी मुंबईत 214 पाऊस झाला होता, असही आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीन वातावरणीय बदलांच्या निमित्तानं केलेल्या अभ्यासात वातावरणीय बदलामुळं जी क्षेत्र अधिक असुरक्षित आहेत त्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

सर्वाधिक रुग्णसंख्येच्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावा, केंद्राच्या महाराष्ट्रासह केरळला कोरोनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना

सुप्रीम कोर्टाची ईडी, सीबीआय कारवाईवर शंका; नवाब मलिक म्हणतात, याचा अर्थ सूडभावनेनेच कारवाई

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

BMC Commissioner Iqbal Chahal predict a large part of Mumbai will be submerged till 2050 due to Climate Change

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.