मुख्यमंत्र्यांचा बंगलाही थकबाकीदारांच्या यादीत; ‘वर्षा’ने साडेसात लाख थकवले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याला मुंबई महानगरपालिकेने ‘डिफॉल्टर’ म्हणून घोषित केले. मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला ‘वर्षा’वर पाण्याची 7 लाख 44 हजार 981 रुपयांची थकबाकी आहे.

मुख्यमंत्र्यांचा बंगलाही थकबाकीदारांच्या यादीत; 'वर्षा'ने साडेसात लाख थकवले

मुंबई: सामान्य मुंबईकरांनी 2 ते 3 महिन्यापेक्षा अधिक पाण्याची थकबाकी ठेवली, तर बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांची जलजोडणी खंडित करते. मात्र, महानगरपालिका मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर अधिकच मेहरबान असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर आतापर्यंत पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे अखेर पालिकेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासह या बंगल्यांना डिफॉल्टर यादीत टाकले.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. यात ही थकबाकीची आकडेवारी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला ‘वर्षा’वर पाण्याची 7 लाख 44 हजार 981 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कर थकवल्याप्रकरणी पालिकेने हे पाऊल उचलले.

कर थकवेगिरी करणाऱ्यांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासापासून अनेक मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी), शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, (सेवासदन), गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता (पर्णकुटी), ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), आदिवासी मंत्री विष्णू सावरा (सागर), अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्ये मंत्री गिरीश बापट (ज्ञानेश्वरी), वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिवनेरी),  परिवहन मंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरण मंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले (सातपुडा), पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (मुक्तागीरी), एकनाथ खडसे (रामटेक),  मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी  तोरणा, रामराजा निंबाळकर, विधानसभा सभापती  (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृह आणि इतर शासकीय आवासांचा या यादीत समावेश आहे.

कोणत्या मंत्र्यांच्या निवासावर किती पाण्याची थकबाकी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – वर्षा बंगला – एकूण थकबाकी 7 लाख 44 हजार 981 रुपये

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार – देवगिरी – एकूण थकबाकी 1 लाख 45 हजार 55 रुपये

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे – सेवासदन – एकूण थकबाकी 1 लाख 61 हजार 719 रुपये

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे – रॉयलस्टोन – एकूण थकबाकी 35 हजार 33 रुपये

आदिवासी मंत्री विष्णू सावरा – सागर – एकूण थकबाकी 1 लाख 82 हजार 141 रुपये

माजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट – ज्ञानेश्वरी –  एकूण थकबाकी 59 हजार 778 रुपये

वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन – एकूण थकबाकी 2 हजार 23 रुपये

परिवहन मंत्री दिवाकर रावते – मेघदूत – एकूण थकबाकी 1लाख 5 हजार 484 रुपये

उद्योगमंत्री सुभाष देसाई – पुरातन – एकूण थकबाकी 2 लाख 49 हजार 243 रुपये

पर्यावरण मंत्री रामदास कदम – शिवगिरी – एकूण थकबाकी 8 हजार 988 रुपये

सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे – नंदनवन – एकूण थकबाकी 2 लाख 28 हजार 424 रुपये

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे – जेतवन – एकूण थकबाकी 6 लाख 14 हजार 854 रुपये

सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत – चित्रकुट – एकूण थकबाकी 1 लाख 55 हजार 852 रुपये

माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले – सातपुडा –  एकूण थकबाकी 1 लाख 6 हजार रुपये

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर – मुक्तागीरी – एकूण थकबाकी 1 लाख 73 हजार 497 रुपये

माजी महसुल मंत्री – एकनाथ खडसे – रामटेक – एकूण थकबाकी 2 लाख 18 हजार 998 रुपये

विधानसभा सभापती रामराजे  निंबाळकर – अजंथा – एकूण थकबाकी 29 हजार 32 रुपये

सह्याद्री अतिथिगृह – एकूण थकबाकी 12 लाख 4 हजार 390 रुपये

सामान्या नागरिकांचे कर थकले की त्यांच्या मुलभूत सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेणारी मनपा आता काय करणार? या सरकारी करथकवेदारांवर मुंबई महापालिका आयुक्त कधी आणि काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.


Published On - 8:26 am, Mon, 24 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI