BMC Election Results 2026 LIVE : कुलाबा-फोर्टमध्ये कुणाचे वर्चस्व? वाचा सविस्तर निकाल

Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल: दक्षिण मुंबईतील प्रभाग २२५, २२६ आणि २२७ मधील राजकीय चुरस आणि विजयी उमेदवारांचा सविस्तर आढावा.

BMC Election Results 2026 LIVE : कुलाबा-फोर्टमध्ये कुणाचे वर्चस्व? वाचा सविस्तर निकाल
bmc
| Updated on: Jan 16, 2026 | 6:58 AM

BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून दक्षिण मुंबईतील प्रभाग 225, 226 आणि 227 मध्ये राजकीय सत्तासंघर्षाचे चित्र स्पष्ट झाले आहे. फोर्ट, ताजमहाल हॉटेल, नरिमन पॉईंट आणि नेव्ही नगर यांसारख्या ऐतिहासिक आणि प्रशासकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील भागांचा समावेश असलेल्या या तीन प्रभागांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. गेल्या निवडणुकीत प्रभाग 225 मध्ये शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी वर्चस्व राखले होते, तर 226 आणि 227 मध्ये अनुक्रमे हर्षदा नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांनी विजय मिळवून भाजपची ताकद सिद्ध केली होती. यंदा बदललेले आरक्षण आणि राजकीय समीकरणे पाहता, या प्रभागांमध्ये जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नागरी सुविधा यांसारखे स्थानिक मुद्दे निर्णायक ठरले आहेत. या प्रभागात भाजप आपला गड राखण्यात यशस्वी झाला की शिवसेनेने पुन्हा मुसंडी मारली, या चुरशीच्या लढतीचा सविस्तर निकाल आता समोर येत आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
225
226
227

प्रभाग 225 : सुमारे 61,341 लोकसंख्या असलेल्या या प्रभागात फोर्ट, ताजमहाल हॉटेल, गेट वे ऑफ इंडिया आणि बीपीटी जेटी यांसारख्या मुंबईच्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश होतो. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी भाजपच्या योजना ठोकळे यांचा पराभव करत येथे विजय मिळवला होता. दक्षिण मुंबईचा हा भाग राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो.

Live

Municipal Election 2026

05:43 PM

Maharashtra Election Results 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया..

05:38 PM

Mumbai Nagarsevak Election Results 2026 : रवींद्र चव्हाण यांनी विजयाचे श्रेय थेट दिले...

05:45 PM

मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी

05:03 PM

मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 48 मधून काँग्रेसचे उमेदवार रफिक इलियास शेख आघाडीवर

05:38 PM

सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री

04:44 PM

पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत

प्रभाग 226 : नरिमन पॉईंट, मच्छिमार नगर आणि गणेशमूर्ती नगर यांसारख्या टोकाच्या दोन्ही आर्थिक स्तरांतील वस्त्यांनी व्यापलेल्या या प्रभागाची लोकसंख्या 62,978 आहे. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी आरक्षित आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या हर्षदा नार्वेकर यांनी शिवसेनेच्या स्मिता पवळे यांचा पराभव करत या भागावर भाजपचे वर्चस्व निर्माण केले होते.

प्रभाग 227 : गीता नगर, अफगाण चर्च आणि नेव्ही नगर या लष्करी व निवासी भागांनी बनलेल्या प्रभाग 227 ची लोकसंख्या 60,695 इतकी आहे. हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी शिवसेनेच्या अरविंद राणे आणि काँग्रेसच्या पूरन दोशी यांच्यावर मात करत हा प्रभाग जिंकला होता. ज्यामुळे कुलाबा परिसरात भाजपची ताकद निर्माण झाली होती.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE