
BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीनंतर आता साऱ्या राज्याचे लक्ष निकालांकडे वेधले गेले आहे. मुंबई महापालिकेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जी-दक्षिण (G/S) वॉर्डातील 193 ते 199 या प्रभागांच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी यांसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय हाय-प्रोफाइल मानल्या जाणाऱ्या या वॉर्डात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः वरळी कोळीवाडा, बी.डी.डी. चाळ आणि आर्थर रोड जेल यांसारख्या वैविध्यपूर्ण मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या वॉर्डातील बहुतांश जागा महिला आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने यंदा प्रस्थापितांना धक्का बसणार की नवीन नेतृत्व उदयास येणार, याचा फैसला आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 193 | हेमांगी वरळीकर | शिवसेना ठाकरे गट |
| 194 | निशिकांत शिंदे | शिवसेना ठाकरे गट |
| 195 | विजय भगणे (आघाडीवर) | शिवसेना ठाकरे गट |
| 196 | पद्मजा चेंबूरकर (आघाडीवर) | शिवसेना ठाकरे गट |
| 197 | ||
| 198 | ||
| 199 | किशोरी पेडणेकर (आघाडीवर) | शिवसेना ठाकरे गट |
प्रभाग 193 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 60,668 इतकी आहे. यात प्रामुख्याने वरळी गाव, बीपीटी कॉलनी, प्रभादेवी यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांनी येथून विजय मिळवला होता.
Maharashtra Election Results 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया..
Mumbai Nagarsevak Election Results 2026 : रवींद्र चव्हाण यांनी विजयाचे श्रेय थेट दिले...
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 48 मधून काँग्रेसचे उमेदवार रफिक इलियास शेख आघाडीवर
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत
प्रभाग 194 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 58,160 इतकी आहे. यात प्रामुख्याने सेंच्युरी मिल, सेंच्युरी बाजार, प्रभादेवी यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे समाधान सरवणकर यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 195 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 54,936 इतकी असून यामध्ये अनुसूचित जातीची (SC) लोकसंख्या 7,021 आहे. यात प्रामुख्याने वरळीतील बी.डी.डी. चाळ, रेल्वे कॉलनी, लोअर परळ (पश्चिम) यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संतोष खरात यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 196 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 55,195 इतकी आहे. यात प्रामुख्याने वरळी डेअरी, म्युनिसिपल कॉलनी, पोलीस कॅम्प यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 197 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 50,068 इतकी आहे. यात प्रामुख्याने महालक्ष्मी रेसकोर्स, रमाबाई नगर, जिजामाता नगर, हाजी अली यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे दत्ताराम नरवणकर यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 198 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 53,930 इतकी आहे. यात प्रामुख्याने सनिमल लेन, मफतलाल मिल, वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप, धुरु वाडी, गांधी नगर यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर यांनी येथून विजय मिळवला होता.
प्रभाग 199 : या प्रभागाची एकूण लोकसंख्या 60,385 इतकी आहे. यात प्रामुख्याने आर्थर रोड जेल, धोबी घाट, शांती नगर, आदर्श नगर यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी येथून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE