
BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिका 2026 च्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. मुंबईच्या एस वॉर्डमध्ये (S-Ward) ईशान्य मुंबईतील भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई या उपनगरांचा समावेश होतो. यात 109 ते 122 इतके प्रभाग येतात. या प्रभागात कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हा परिसर भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. या ठिकाणी एकीकडे डोंगरदऱ्यांत वसलेल्या वस्त्या आहेaत. तर दुसरीकडे पवई आणि विक्रोळीसारख्या उच्चभ्रू सोसायटी आणि आयटी पार्कही वसलेले आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत या वॉर्डमधील बहुतांश प्रभागात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले होते. तर काही प्रभागात भाजपनेही मुसंडी मारली होती. पण यंदा बदललेली राजकीय समीकरणे, शिवसेनेत पडलेली फूट आणि प्रभागांचे नव्याने झालेले आरक्षण यामुळे या 14 प्रभागांमधील लढत अत्यंत चुरशीची ठरली. त्यामुळे यंदा मतदारांचा कल कोणाकडे आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 109 | ||
| 110 | ||
| 111 | ||
| 112 | ||
| 113 | ||
| 114 | ||
| 115 | ||
| 116 | ||
| 117 | ||
| 118 | ||
| 119 | ||
| 120 | ||
| 121 | ||
| 122 |
प्रभाग 109 : या प्रभागात भांडुप कॉम्प्लेक्स, तुळशेतपाडा, खिंडीपाडा आणि तानसा पाईपलाईन यांसारख्या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या दीपाली गोसावी यांनी येथे विजय मिळवला होता. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 57,611 इतकी आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग 110 : या प्रभागात राजीव गांधीनगर, MMRDA कॉलनी आणि सुभाषनगर या भागांचा समावेश होतो. 2017 मध्ये काँग्रेसच्या आशा कोपरकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत हा गड राखला होता. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव होता. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 52,305 आहे.
प्रभाग 111 : या प्रभागात अंकित नगर, भवानीनगर आणि टाटानगर या भागांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या सागरिका पवार यांनी शिवसेनेच्या संजीवनी तुपे यांचा पराभव केला होता. यंदा हा प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग (OBC) साठी राखीव असून येथील एकूण लोकसंख्या 58,366 आहे.
प्रभाग 112 : या प्रभागात निर्मलनगर, पंजाबी कॉलनी आणि आंबेडकरनगर या भागांचा समावेश होतो. 2017 मध्ये भाजपच्या साक्षी दळवी यांनी विजय मिळवला होता. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51,273 आहे.
प्रभाग 113 : या प्रभागात मिलिंदनगर, गावदेवी (भांडुप पश्चिम) आणि सर्वोदयनगर या भागांचा समावेश होतो. 2017 मध्ये शिवसेनेच्या दीपमाला बढे यांनी येथे विजय मिळवला होता. यंदा हा प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग (OBC) साठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 51,252 आहे.
प्रभाग 114 : या प्रभागात क्रांतीनगर, आनंदनगर आणि सॅविअर हॉस्पिटल परिसराचा समावेश होतो. 2017 मध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी येथून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पक्षांची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 50,837 आहे.
प्रभाग 115 : या प्रभागात कोकणनगर, समर्थनगर आणि पठाण कॉलनी या भागांचा समावेश होतो. 2017 मध्ये शिवसेनेचे उमेश माने यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 48,336 आहे.
प्रभाग 116 : या प्रभागात हनुमान टेकडी, न्यू कॉलनी आणि फुलेनगर या भागांचा समावेश होतो. 2017 मध्ये काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव असून येथील लोकसंख्या 54,776 आहे.
प्रभाग 117 : या प्रभागाची व्याप्ती कांजूर व्हिलेज, NCH कॉलनी आणि इंदिरानगर या प्रमुख भागांपर्यंत आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा करंजे यांनी येथे बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीसाठी हा प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आला असून येथील एकूण लोकसंख्या 55,331 इतकी आहे.
प्रभाग 118 : कन्नमवार नगर 1 व 2 आणि टागोर नगर यांसारख्या मोठ्या गृहनिर्माण वसाहतींचा समावेश असलेला हा महत्त्वाचा प्रभाग आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उपेंद्र सावंत यांनी भाजपचे उमेदवार मंगेश सांगळे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. 55,966 लोकसंख्या असलेल्या या प्रभागाचे आरक्षण आता अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आहे.
प्रभाग 119 : भारत नगर, अशोक नगर आणि काळाघोडा रामवाडी या परिसरांचे प्रतिनिधित्व करणारा हा प्रभाग 59,031 लोकसंख्येचा आहे. 2017 मध्ये येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा रहाटे विजयी झाल्या होत्या. यंदा हा प्रभाग कोणत्याही आरक्षणाशिवाय सर्वसाधारण (General) गटासाठी खुला आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.
प्रभाग 120 : सूर्यानगर, चंदननगर आणि गोदरेज हिलसाईड कॉलनी या भागांचा या प्रभागात प्रामुख्याने समावेश होतो. मागील वेळी शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडकर यांनी या प्रभागातून विजय मिळवला होता. 55,084 लोकसंख्या असलेल्या या प्रभागाची निवडणूक यंदा सर्वसाधारण गटातून लढवली जाणार आहे.
प्रभाग 121 : पवई लेक, आय.आय.टी. पवई आणि मयुरनगर या प्रतिष्ठित आणि शैक्षणिक भागांचा मिळून हा प्रभाग बनला आहे. 2017 मध्ये शिवसेनेच्या चंद्रावती मोरे यांनी येथे वर्चस्व राखले होते. 46,186 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा अनुसूचित जमाती (महिला) उमेदवारांसाठी राखीव करण्यात आला आहे.
प्रभाग 122 : हिरानंदानी गार्डन, म्हाडा कॉलनी आणि जलवायू विहार यांसारख्या उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये चुरशीची लढत झाली होती. यात भाजपच्या वैशाली पाटील यांनी शिवसेनेच्या स्नेहल मांडे यांचा पराभव केला होता. 47,726 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा सर्वसाधारण गटासाठी राखीव करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE