मुंबई महानगरपालिकेच्या ‘वि. न. देसाई रुग्णालयात ‘डी. एन. बी.’ अभ्यासक्रम सुरु होणार, मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणार

मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सांताक्रुज पूर्व परिसरातील वि.न. देसाई हे 276 खाटांचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. 'कोविड - 19' या साथ रोगाच्या काळात या रुग्णालयाने पश्चिम उपनगर वासियांना प्रभावी सेवा दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या 'वि. न. देसाई रुग्णालयात 'डी. एन. बी.' अभ्यासक्रम सुरु होणार, मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणार
BMC

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सांताक्रुज पूर्व परिसरातील वि.न. देसाई हे 276 खाटांचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. ‘कोविड – 19’ या साथ रोगाच्या काळात या रुग्णालयाने पश्चिम उपनगर वासियांना प्रभावी सेवा दिली आहे. कोविड बाधित रुग्णांवर उपचार, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण याबरोबरच विविध वैद्यकीय उपचार आणि सेवा सुविधा या रुग्णालयाद्वारे देण्यात येत आहेत. “आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास” यानुसार अव्याहतपणे सेवा सुविधा देणाऱ्या या रूग्णालयात 27 वरिष्ठ डॉक्टर, 40 निवासी वैद्यकीय अधिकारी, 143 परिचारिका, 65 वॉर्डबॉय आणि 243 इतर कर्मचारी कार्यरत आहेत. या रुग्णालयात लवकरच ‘डी.एन.बी. अभ्यासक्रम’ सुरू होत असून यामुळे मुंबईकर नागरिकांना अधिक प्रभावी वैद्यकीय सेवा सुविधा मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांनी दिली आहे.

वि.न. देसाई रुग्णालय 24 तास सुरु

मुंबई महानगरपालिकेच्या वि. न. देसाई रुग्णालयात आकस्मिक वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांवर आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास उपचार केले जातात. या अनुषंगाने अनेक रुग्णांना त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेऊन रुग्णालयात वेळोवेळी दाखलही करण्यात येते. त्यामुळे आकस्मिक वैद्यकीय सेवेसाठी नोंदणी करण्याची अर्थात केस पेपर काढण्याची प्रक्रिया ही आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास सुरू असते. या अंतर्गत दररोज साधारणपणे 50 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. तर ज्या रुग्णांना अत्यंतिक प्रभावी वैद्यकीय उपचारांची गरज असते, अशा रुग्णांना महापालिकेच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये महापालिकेच्याच रुग्णवाहिकेद्वारे आवश्यक ती काळजी घेत पाठविले जाते.

वरील व्यतिरिक्त किरकोळ वा प्राथमिक स्तरीय वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी बाह्य रुग्णसेवेची (ओपीडी) नोंदणी ही सुट्टीचे दिवस वगळता रोज सकाळी 8 वाजता सुरू होते. या रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी 1 हज़ार 300 रुग्णांची ‘ओपीडी’ नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यावर बाह्य सेवा पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयात ऑगस्ट 2021 मध्ये 14 ऑगस्ट 2021 पर्यंत 32 प्रसूती करण्यात आल्या. तर जुलै 2021 मध्ये 103, जून 2021 मध्ये 111; तर मे 2021 मध्ये 143 प्रसूती करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेतल्यास, रुग्णालयामध्ये दर महिन्याला सरासरी 118 प्रसूती केल्या जातात.

वरील व्यतिरिक्त या रुग्णालयात महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी देखील नियमितपणे करण्यात येत असते. या अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये 14 तारखेपर्यंत 611 रुग्णांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यात आली. त्यापूर्वी म्हणजे जुलै 2021 मध्ये 1 हजार 163, जून 2021 मध्ये 1 हजार 357, मे 2021 मध्ये 945 महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यात आली. सदर रुग्णालयामध्ये दर महिन्याला सरासरी 1 हजार 155 महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यात येते.

मुंबई महानगरपालिकेच्या या उपनगरीय रुग्णालयामध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग

स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या विभागात गरजू महिलांवर वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यासह शस्त्रक्रिया देखील करण्यात येतात. यानुसार ऑगस्ट 2021 मध्ये 14 तारखेपर्यंत 45 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर त्यापूर्वी म्हणजे जुलै 2021 मध्ये 95 शस्त्रक्रिया, जून 2021 मध्ये 90 व मे 2021 मध्ये 80 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर रुग्णालयामध्ये दर महिन्याला सरासरी 90 इतक्या स्त्रीरोग विषयक शस्त्रक्रिया केल्या जातात.

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून या रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा भाग असणारा ‘डी एन बी’ अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने येथील रुग्णशय्येच्या प्रमाणात वर्ग 1 व 2 चे प्रत्येकी 2, यानुसार एकूण 4 अनुभवी ‘डी एन बी’ शिक्षक यापूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. या अनुभवी शिक्षकांद्वारे देसाई रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात अहोरात्र सेवा दिली जात आहे.

इतर बातम्या:

MU bomb hoax | मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी, ईमेल पाठवणारा निघाला बीकॉमचा विद्यार्थी

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

BMC hospital V N Desai hospital started DNB course from this year

Published On - 6:27 pm, Sun, 15 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI