AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रणौत, नारायण राणे यांच्यानंतर मोहित कंबोज BMC च्या निशाण्यावर, पालिकेला अतिरिक्त बांधकामाचा संशय

मुंबई महापालिकेकडून (BMC) अनधिकृत बांधकामांसर्भात करण्यात येणाऱ्या कारवाया सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली तोडक कारवाई चांगलीच गाजली होती.

कंगना रणौत, नारायण राणे यांच्यानंतर मोहित कंबोज BMC च्या निशाण्यावर, पालिकेला अतिरिक्त  बांधकामाचा संशय
मोहित कंबोज Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेकडून (BMC) अनधिकृत बांधकामांसर्भात करण्यात येणाऱ्या कारवाया सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेली तोडक कारवाई चांगलीच गाजली होती. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यासंदर्भात बीएमसीकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना आतापर्यंत तीन नोटीस पाठवल्या असून 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांनी बीएमसीच्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेनं आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना देखील एक नोटीस पाठवली आहे. बीएमसीनं कलम 488 नुसार ही नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात कंबोज यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिलेली आहे.

मोहित कंबोज यांच्या इमारतीत अतिरिक्त बांधकामाचा बीएमसीला संशय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेनी आता भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे, असा पालिकेला शंका आहे.23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहे असा नोटीस मध्ये उल्लेख आहे.

मोहित कंबोज यांचं ट्विट

मविआपुढं झुकणार नाही, कंबोज यांचा दावा

काही महिन्यांपासून महाविकास आघाडी नेते आणि मोहित कंबोजमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. मोहित कंबोज यांनी नोटीसची माहिती ट्विट करुन दिली. माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करू शकले नाहीत म्हणून मुंबई महानगरपालिकेनं माझ्या घरी नोटीस पाठवली आहे.कंगना रणौत असो किंवा नारायण राणे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु शकले नाहीत. आता घर तोडायचे काही असेल तर हरकत नाही. काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही असंही कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इतर बातम्या :

TV9 Marathi Poll : एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून महाविकास आघाडीनं योग्य केलं का? जाणून घ्या जनतेचं मत

राज्यपालांच्या हस्ते 97 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान; 79 अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.