AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांच्या हस्ते 97 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान; 79 अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके

पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील 97 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. 21 मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

राज्यपालांच्या हस्ते 97 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान; 79 अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके
police MedalImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 11:09 PM
Share

मुंबईः पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील 97 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके (Presidential Police Medal) तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन (Rajbhavan) येथे सोमवारी (दि. 21 मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके (Police gallantry medals) प्रदान करण्यात आली, तर 8 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली. 79 पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण समारोहाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व गौरविण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

पोलीस शौर्य पदकांनी गौरव

पोलीस उप आयुक्त‍ डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेडडी, पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण समीरसिंह द्वारकोजीराव साळवे, सहायक पोलीस निरीक्षक सोलापूर ग्रामीण मिथु नामदेव जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली अविनाश अशोक कांबळे, पोलीस हवालदार गडचिरोली सुरपत बावजी वड्डे, पोलीस नाईक गडचिरोली वसंत बुचय्या आत्राम, पोलीस शिपाई, गडचिरोली आशिष मारुती हलामी, पोलीस शिपाई गडचिरोली विनोद चैतराम राऊत, पोलीस शिपाई गडचिरोली नंदकुमार उत्तेश्वर, आग्रे व पोलीस शिपाई गडचिरोली हामित विनोद डोंगरे यांना पोलीस शौर्य पदकांनी गौरवण्यात आले.

उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक

सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) रामचंद्र शिवाजी जाधव, सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) राजाराम रामराव पाटील, सहायक पोलीस आयुक्त मिलींद भिकाजी खेटले, सहायक समादेशक हरिश्चंद्र गोपाळ काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) मारुती कल्लाप्पा सूर्यवंशी, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, अप्पर पोलीस महासंचालक व प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग मंत्रालय, मुंबई संजय सक्सेना, सहायक पोलीस उप निरीक्षक वसंत रामचंद्र साबळे (सेवानिवृत्त) यांना उल्लेखनीय सेवेबददल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विक्रम नंदकुमार देशमाने, पोलीस उप आयुक्त सुरेशकुमार सावलेराम मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त नेताजी शेकुंबर भोपळे (सेवानिवृत्त), सहायक पोलीस आयुक्त किरण विष्णू पाटील (सेवानिवृत्त), सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) मुकुंद नामदेवराव हातोटे, अपर पोलीस अधीक्षक (सेवानिवृत्त) दिलीप पोपटराव बोरस्टे, पोलीस उपअधीक्षक अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी, पोलीस उप अधीक्षक गोपिका शेषदास जहागिरदार, सहायक पोलीस आयुक्त बालाजी रघुनाथ सोनटक्के, पोलीस उप अधीक्षक राजेद्र लक्ष्मणराव कदम, पोलीस उप अधीक्षक रविंद्र गणपत बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश दिगंबर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली साबिर अली, पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ गनी शेख, पोलीस निरीक्षक नानासाहेब विठ्ठल मसाळ, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) प्रकाश भिवा कदम, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) किशोर अमृत यादव, राखीव पोलीस उपनिरीक्षक रमेश दौलतराव खंडागळे (सेवानिवृत्त), पोलीस उप निरीक्षक राजेंद्र नारायण पोळ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश गोविंदराव सातपुते, पोलीस उपनिरीक्षक मक्सूद अहमदखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक रघूनाथ मंगळू भरसट, पोलीस उपनिरीक्षक कचरू नामदेव चव्हाण, पोलीस उप निरीक्षक अशोक सोमाजी तिडके, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शामराव ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गोरख मानसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग नारायण सावर्डे, गुप्तवार्ता अधिकारी प्रभाकर धोंडु पवार (सेवानिवृत्त), सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम तुकाराम उगलमुगले (सेवानिवृत्त), सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर लक्ष्मण चिंताल्लू, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामराव दासू राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गोरखनाथ जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील गणपतराव हरणखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अव‍िनाश सुधीर मराठे, सहायक पोलीस उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन भास्करराव शिवलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश सोमा राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू मच्छिद्र भोई, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश तुकाराम गोरेगावकर, सहायक पोलीस उपमहानिरीक्षक अतुल प्रल्हाद पाटील पोलीस अधीक्षक नंदकुमार त्रंयबक ठाकुर, सहायक पोलीस आयुक्त नंदक‍िशोर केशवराव मोरे (सेवानिवृत्त), अपर पोलीस अधीक्षक मिलींद सुधाकर तोतरे (सेवानिवृत्त), पोलीस उपअधीक्षक स्टीवन मॅथ्युज अँन्थोनी (सेवानिवृत्त), पोलीस उपअधीक्षक संभाजी सुदाम सावंत, पोलीस अधीक्षक नंदुरबार, सहायक पोलीस आयुक्त चंद्रशेखर गोविंद सावंत, सहायक पोलीस आयुक्त मुंकुदं गोपाळ पवार, सहायक पोलीस आयुक्त इंद्रजित किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत हनुमंत भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त मंदार वसंत धर्माधिकारी, पोलीस निरीक्षक (सहायक पोलीस आयुक्त) कयोमर्झ बमन ईराणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन लक्ष्मण कब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्रीमती निलिमा मुरलीधर आरज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम केशव पातारे, पोलीस निरीक्षक किसन अर्जुन गायकवाड (सेवानिवृत्त), पोलीस निरीक्षक सुधीर दत्तराम दळवी, पोलीस निरीक्षक सुभाष नानासाहेब भुजंग, पोलीस निरीक्षक सदानंद हरिभाऊ मानकर, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी नितीन जयवंत मालप, राखीव पोलीस उपनिरीक्षक जमील इस्माईल सय्यद (सेवानिवृत्त), पोलीस उपनिरीक्षक मधुकर मारूती चौगुले,पोलीस उपनिरीक्षक राजू बळीराम अवताडे, पोलीस उपनिरीक्षक महेबूबअली जियाउद्यीन सैयद, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश पांडुरंग शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक बत्तुलाल रामलोटण पांडे, गुप्तवार्ता अधिकारी शशिकांत सोनबा लोखंडे, गुप्तवार्ता अधिकारी बाबुराव दौलत बिऱ्हाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशपाक अलि बकरअली चिष्टिया, सहायक पोलीस उपनिरीक्षक भानुदास जग्गनाथ जाधव ( सेवानिवृत्त ), सहायक पोलीस उपनिरीक्षक भिकन गोविंदा सोनार ( सेवानिवृत्त ), सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत निवृत्ती तरटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र यलगोंडा नुल्ले, सहायक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव सवाईराम राठोड, सहायक पोलीस उप निरीक्षक दशरथ बाबुराव चिंचकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रातनगीर गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप हरिश्चंद्र जांभळे, सहायक पोलीस उप निरीक्षक संजय राजाराम वायचळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण संभाजी टेंभूर्णे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या

Ulhasnagar Accident : उल्हासनगरात रिक्षा-टेम्पोची जोरदार धडक, काचा चेहऱ्यात घुसल्याने रिक्षाचालक जखमी

ED : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ईडीचे 2974 छापे, 2005 पासून आतापर्यंत केवळ 23 दोषी, आकडेवारी लोकसभेत सादर

Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.