VIDEO | मुंबईत भगवतीच्या डॉक्टरांना शिवसेना नगरसेविकेची दमदाटी, महापौरांकडून समज, संध्या दोषींचा माफीनामा

VIDEO | मुंबईत भगवतीच्या डॉक्टरांना शिवसेना नगरसेविकेची दमदाटी, महापौरांकडून समज, संध्या दोषींचा माफीनामा
शिवसेना नगरसेविका संध्या दोषी

कोरोना काळात रुग्णांसाठी दिवसरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना नगरसेविकेने रुग्णालयात दमदाटी केल्याने संताप व्यक्त केला जात होता. (Sandhya Doshi scold Hospital Doctors )

अनिश बेंद्रे

|

Apr 21, 2021 | 2:48 PM

मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेविका संध्या दोषी (Sandhya Doshi) यांनी डॉक्टरांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला होता. बीएमसीमध्ये शिक्षण समितीच्या अध्यक्ष असलेल्या संध्या दोषी यांनी वाद्र्यातील भगवती रुग्णालयात हुज्जत घातली होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला. अखेर संध्या दोषींनी माफीनामा सादर केला. (BMC Shivsena Corporator Sandhya Doshi scold Bhagawati Hospital Doctors apologies in video)

संध्या दोषी यांचा भगवती रुग्णालयातील डॉक्टरसोबत वाद झडतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये ‘अशा दहा हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टर उभे करु शकते. माझ्या नातेवाईकांसोबत तुमची भाषा घाणेरडी होती. डॉक्टरांना सौजन्याने बोलायला शिकवा’ असं दोषी बोलताना ऐकू येत होतं.

कोरोना काळात रुग्णांसाठी दिवसरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना नगरसेविकेने रुग्णालयात दमदाटी केल्याने संताप व्यक्त केला जात होता. याचा निषेध म्हणून भगवती रुग्णालयातील सर्व डॉक्टर सामूहिक राजीनामा देत होते. परंतु संध्या दोषींनी माफी मागितल्याने वादावर पडदा पडला.

संध्या दोषी काय म्हणाल्या होत्या?

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संध्या दोषी यांनी दमदाटी केली नसल्याचा दावा केला होता. “कोणतीही दमदाटी केलेली नाही. ही पहिली-दुसरी नाही, तर तिसरी वेळ आहे. मी माझी कामं सोडून तिथे गेले, तेव्हा रुग्ण एक तासापासून त्रस्त होता. खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन तो तिथे आला होता. त्याची ऑक्सिजन लेव्हल 92 होती. तासाभरानंतर त्याची लेव्हल 67 होऊनही डॉक्टरांनी कार्यवाही केली नाही. ऑक्सिजन लावला नाही, त्यामुळे रुग्णाच्या पत्नीने मला फोन केला आणि त्या रडायला लागल्या” असं संध्या दोषींनी सांगितलं.

“त्या पेशंटसाठी आपण एक दिवस आधी बेड बुक करुन ठेवला होता. पण डॉक्टरांची वागणूक अशी होती, की जोपर्यंत डीनचा फोन येणार नाही, तोपर्यंत आम्ही अॅडमिट करणार नाही. रुग्ण व्हिलचेअरवर होता, त्याची पत्नी रडवेली झाली होती. मी तिथे पोहोचल्यानंतर ऑक्सिजन लावण्यात आलं. आणि मग आयसीयू बेडला शिफ्ट केलं. त्यामुळे मी डॉक्टरांना ही महिलांशी बोलण्याची पद्धत आहे, असं सांगितलं.” असं ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संध्या दोषी यांनी स्पष्ट केलं होतं.

पाहा व्हिडीओ :

महापौरांकडून दखल

संध्या दोषींच्या वादाची माहिती घेतली आहे. संध्या दोषी यांना यांना समज दिली आहे. कोणतीही गोष्ट एका बाजूने होत नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसवर अनेक डॉक्टर आहेत. गैरवर्तणूक फक्त संध्या दोषी यांच्याकडून झालेले नाही. डॉक्टरांनी सुद्धा सौजन्याने वागावे. डीन बरोबर याबाबत बोलणे झाले आहे. मी या रूग्णालयातील डॉक्टरांना भेटणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Sandhya Doshi scold Hospital Doctors )

संध्या दोषी यांचा माफीनामा

माझा उद्देश पेशंटला अॅडमिट करण्याचा होता. त्यातून माझ्याकडून डॉक्टर किंवा स्टाफ यांचे मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करते, असा व्हिडीओ संध्या दोषी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandhya Doshi (@doshi_sandhya)

संबंधित बातम्या :

गर्भवती महिलेला रुग्णालयातून बाहेर काढल्याचा वाद, शिवसेना नगरसेवकाने माघार घेत माफी मागितली, डॉक्टरांचा संप मागे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें