AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मितीला ग्रीन सिग्नल, स्थायी समितीकडून शिक्कामोर्तब

मुंबई महापालिकेच्या बैठकीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. (Standing Committee Approve  Mumbai Electricity Generate from Garbage Project)

मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मितीला ग्रीन सिग्नल, स्थायी समितीकडून शिक्कामोर्तब
bmc
| Updated on: Nov 05, 2020 | 10:51 AM
Share

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या बैठकीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. (Standing Committee Approve  Mumbai Electricity Generate from Garbage Project)

मुंबईत दररोज सुमारे 5 हजार मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याची याच ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रदूषण होते. मुंबईतील कचरा आणि प्रदूषण कमी व्हावं यासाठी पालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांचा असून याद्वारे 25 मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे.

मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्ताव हा 2018 मध्ये मांडण्यात आला होता. मात्र, त्या प्रस्तावात भ्रष्टाचार असल्याचे कारण देत शिवसेनेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मितीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. आज दोन वर्षांनी हा प्रस्ताव स्थायी समितीत पुन्हा एकदा मंजुरीसाठी आला. त्यावेळी मात्र शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा विरोध न करता यासाठी मंजुरी दिली.

या प्रस्तावाविरोधात विरोधकांना मत मांडण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या प्रस्तावाची मंजुरी ही नियमबाह्य आहे, असे पत्र समाजवादी पार्टीचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी स्थायी समितीला दिलं आहे. (Standing Committee Approve  Mumbai Electricity Generate from Garbage Project)

संबंधित बातम्या : 

चितळे बंधूंचे ठाण्यात ‘ठाण’, मुक्ता बर्वेच्या हस्ते दुकानाचे उद्घाटन

BMC पाठोपाठ BEST कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड, गेल्या वर्षीपेक्षा 4600 रुपये अधिक बोनस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.