AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. | Narendra Dabholkar Murder case

मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर
| Updated on: May 06, 2021 | 12:53 PM
Share

मुंबई: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्य़कर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (Vikaram Bhave accused in the murder of Narendra Dabholkar case grants bail by Mumbai HC)

त्यानंतर बराच काळ पोलिसांना याप्रकरणात काहीही ठोस पुरावे मिळाले नव्हते. अखेर 25 मे 2019 रोजी पोलिसांनी विक्रम भावे याला अटक केली होती. सीबीआयने त्याच्यावर मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवला होता. तेव्हापासून विक्रम भावे तुरुंगात होता. मात्र, आज उच्च न्यायालयाने विक्रम भावे याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर विक्रम भावेला साधारण आठवडाभर पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांसाठी त्याला आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा अशाप्रकारे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. तसेच विक्रम भावेला न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

दाभोलकरांच्या हत्येला सात वर्ष उलटूनही मारेकऱ्यांचा शोध नाही

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते.

दाभोलकरांच्या हत्येला 7 वर्षाचा कालावधी लोटला आहे. पाच वर्षानंतर या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. नालासोपारा स्फोटकप्रकरणी तपास करीत असताना एटीएसला डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले होते.

संबंधित बातम्या 

Dabholkar murder case : ठाण्याजवळच्या खाडीतून पिस्तुल शोधलं, नॉर्वेच्या जलतरणपटूंना यश

डॉ. दाभोलकर हत्या : पुनाळेकर आणि भावेला 4 जूनपर्यंत CBI कोठडी

(Vikaram Bhave accused in the murder of Narendra Dabholkar case grants bail by Mumbai HC)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.