AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या एका फायरब्रँड महिला नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, 'या' फायरब्रँड महिला नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा
उद्धव ठाकरेImage Credit source: Google
| Updated on: Jan 14, 2023 | 11:02 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर (Maharashtra Politics) करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे सत्तांतरानंतरही एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांसह हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात सामील करुन घेतलंय. मुंबईतील मोठमोठे नेते शिंदेंसोबत आहेत. त्यानंतर ठाण्यातही तिच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाण्यापाठोपाठ एकनाथ शिंदे गट नाशिकचा गड काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही मिळताना दिसत आहे. हेही असे की थोडे आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या फायरब्रँड महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. किशोरी यांच्याविरोधात एसआरए प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

मुंबईच्या वांद्र्यातील निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या विषयी माहिती दिली आहे.

“शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात झोपडपट्टी प्राधिकारणाशी एआरए तक्रारीप्रमाणे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत होतो”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

“एसआरएचे गाळे ढापणे. स्वत:च्या कंपनीचं कार्यालय उघडणे या सगळ्या आरोपांप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय”, असंदेखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

किशोरी पेडणेकर या मुंबईच्या माजी महापौर होत्या. त्यांनी महापौरपदी असताना घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पातून घोटाळा करुन गाळे मिळवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याशिवाय कोरोना काळात कोव्हिड सेंटरच्या नावाने मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांचे धक्क्यावर धक्के

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनंतर अनेक नेत्यांवर ईडी, आयकर विभागकडून कारवाई करण्यात आलीय. अनेकांच्या घरांवर धाडी पडल्या आहेत.

सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजीत पाटकर यांची भागीदारी असलेल्या कंपनीविरोधातही तक्रार केली होती. या प्रकरणी काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.