AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : जात कुणाच्या मनात? नितीन गडकरी थेटच बोलले; कुणावर चढवला हल्ला?

Nitin Gadkari on Caste : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक स्फोटक विधान केले आहे. सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आणि इतर जाती असा संघर्ष दिसत आहे. जातीचे राजकारण घट्ट होत असल्याचे दिसत आहे. गडकरी यांनी त्यावर भाष्य केले आहे.

Nitin Gadkari : जात कुणाच्या मनात? नितीन गडकरी थेटच बोलले; कुणावर चढवला हल्ला?
जात कुणाच्या मनात?
| Updated on: Nov 10, 2024 | 3:35 PM
Share

सध्या राजकीय धामधूम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जाहीरनामा जाहीर केला आहे. त्यात घोषणांचा पाऊस पाडला आहे. या राजकीय वातावरणात काही नेत्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेतली जातात. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक स्फोटक विधान केले आहे. सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आणि इतर जाती असा संघर्ष दिसत आहे. जातीचे राजकारण घट्ट होत असल्याचे दिसत आहे. गडकरी यांनी त्यावर भाष्य केले आहे.

जात कुणाच्या मनात?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यासारखाच विदर्भात मोठा फटका बसला होता. नागपूर, अकोला वगळता भाजपाला कमाल दाखवता आली नाही. बुलडाण्याची एक जागा राखण्यात शिंदे सेनेला यश आले. मराठा आरक्षण, कुणबी, आदिवासी, मुस्लिम हे मुद्दे त्यावेळी गाजले. पण गडकरी यांना या फॅक्टरचा फटका बसला नाही. या सर्व घटनाक्रमावर गडकरी यांनी मन मोकळं केलं.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी जात ही पुढाऱ्यांच्या मनात असल्याचे स्फोटक वक्तव्य केलं. जात जनतेच्या मनात नाही, तर ती पुढाऱ्यांच्या मनात असल्याचे ते म्हणाले. काही मतदारसंघात अगदी अल्पसंख्यांक जातीचा खासदार, आमदार निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जातीच्या आधारावर निवडणुकीची गणित मांडण्यात येतात, ती निकालानंतर चुकतात, असे ते म्हणाले. आपल्या जातीचा उपयोग करून दुसर्‍या जातीबद्दल विष कालवून निवडणुकीत कसा फायदा होईल, असा काही पक्षांचा आणि काही नेत्यांचा एक राजकीय कार्यक्रम असल्याचा घणाघात त्यांनी केला.

पण लोकांचं मत हे विकासाचं आहे. विविध योजनांतून त्यांना जो फायदा मिळाला. त्यांच्या जीवनात जो सुसह्यपणा आला, त्याकरीता असल्याचे ते म्हणाले. आरोग्य योजना, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालये, विधी विद्यापीठ यासह मिहान प्रकल्प आला. त्यातून 88 हजार लोकांच्या हाताला रोजगार मिळाला. त्यांची यादी माझ्याकडे आहे. ते कोणत्या जातीचे आहेत ते मला नाही माहिती, पण ते इथले आहेत. स्थानिक आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. जातीपेक्षा लोकांना विकास हवा असल्याचे त्यांनी ध्वनीत केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?