AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा, मुंबईतील सर्वात मोठी बातमी

एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरी छापा टाकला आहे.

BIG BREAKING | समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा, मुंबईतील सर्वात मोठी बातमी
2 ऑक्टोबर 2021 रोजी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्सचे सेवन आणि तस्करी केल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर एक नाव प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे समीर वानखेडे यांचे.
| Edited By: | Updated on: May 12, 2023 | 6:09 PM
Share

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचारादेखील गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सीबीआयने जो गुन्हा दाखल केलाय त्या अनुषंगाने वेगळी काही कारवाई केली जाते का ते पाहणं देखील महत्त्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलाय. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. ही टीम सविस्तर तपास करत होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरण, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावायाचं प्रकरण आणि आणखी असे काही प्रकरणं होती. त्या प्रकरणांप्रकरणी टीमकडून चौकशी करण्यात आली. या टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी सीबीआयकडून कारवाई केली जात आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांकडून छाननी सुरु

संबंधित अहवालाच्या आधारे सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरात छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही छापेमारी आणखी किती ठिकाणी सुरु आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण सीबीआयचं एक पथक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरी झाडाझडती घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून छाननी केली जातेय, अशीदेखील माहिती मिळत आहे. याप्रकरणी तपास नेमका कुठपर्यंत जातो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

समीर वानखेडे यांची वानखेडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई

समीर वानखेडेच्या नेतृत्वाखाली NCB टीमने 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई बंदराजवळ एका क्रूजवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यावेळी बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. आर्यन खान तीन आठवडे तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात NCB ने आर्यन खानसह सहाजणांवरील ड्रग्स बाळगल्याचे आरोप हटवले होते.

समीर वानखेडे यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीमधून एनसीबीच्या एका टीमने तपास आपल्या हाती घेतला. वानखेडेंची बदली केली. या प्रकरणाशी संबंधित एक रिपोर्ट्ही समोर आला होता. त्यात आर्यन खानला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं, असं म्हटलं होतं. एनसीबीच्या तपासात काही त्रुटी होत्या. पुरेसे पुरावे नसताना, तपास पुढे सुरु ठेवला. पाच डझन लोकांची जबानी नोंदवण्यात आली.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.