धाड धाड पोटात गोळ्या, फ्रेडी रक्ताच्या थारोळ्यात; हत्येचा हादरवून सोडणारा CCTV समोर!
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवलीमधील चारकोबप परिसरात एका बिल्डवर गोळ्या झाडण्यात आला. आता या घटनेचा CCTV फूटेज समोर आला आहे. नेमकं त्याच्यावर हल्ला कसा झाला पाहा...

मुंबईतील कांदिवली (पूर्व) येथील चारकोप सेक्टर-२ परिसरात दोन दिवसांपूर्वी एका तरुण बिल्डरवर झालेल्या गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोराने दुचाकीवरून येऊन बिल्डर फ्रेडी दिलीमा भाई यांच्यावर जवळून दोन गोळ्या झाडल्या, ज्यात ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या त्यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेचा CCTV समोर आला आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की हल्लेखोर एका गाडीच्या मागे दडून बसला होता. फेड्री जसे ऑफिसमधून बाहेर आले तसा त्यांच्यावर हल्ला झाला.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये दिसते की, फ्रेडी दिलीमा भाई आणि त्यांचा एक सहकारी ऑफिसमधून बाहेर पडून आपल्या चारचाकी गाडीच्या दिशेने चालत आहेत. गाडीजवळ आधीच एक हेल्मेट घातलेला इसम दबा धरून बसलेला आहे. फ्रेडी गाडीजवळ पोहोचताच हल्लेखोराने समोरून पिस्तूल काढले आणि सलग दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागताच फ्रेडी जमिनीवर कोसळले.
सहकाऱ्याने वाचवले प्राण
फ्रेडीसोबत असलेल्या सहकाऱ्याने धैर्य दाखवत फ्रेडींना झाकण्याचा प्रयत्न केला आणि हल्लेखोराचा पाठलाग करण्यासाठी पुढे धावला. आपला पाठलाग होत असल्याचे पाहून हल्लेखोर घाबरला आणि त्वरित तेथून पळ काढला. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटना बंदर पाखाडी रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर घडली. फ्रेडी दिलीमा भाई यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्या असून त्यांना तात्काळ बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबार करणारा हल्लेखोर दुचाकीवरून आला होता आणि घटनेनंतर तो तेथून फरार झाला. या घटनेमुळे चारकोप परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
