AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान, घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेचा रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांमध्ये दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक घेणार आहे.

सावधान, घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेचा रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक
mega block news
| Updated on: Feb 20, 2026 | 8:51 PM
Share

मध्य रेल्वे रविवार २२ फेब्रुवारी रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक घेणार असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे. कारण मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रक विस्कळीत झालेले असते. त्यामुळे प्रवासात गर्दीचा सामना करावा लागू शकतो. जर काही महत्वाचे काम असेल तर सकाळी लवकर घरातून निघावे असा सल्ला दिला जात आहे.

खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक असणार

मुख्य मार्ग :

मुलुंड आणि ठाणे सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीमा मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०४ वा. ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावरुन पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल फेऱ्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याण येथून १०.३६ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल ट्रेन ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड स्थानकावरून पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल ट्रेन  नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे गंतव्य स्थानकावर उशिराने पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.

हार्बर मार्ग बंद

पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ( पोर्ट लाईन वगळून ) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन मार्ग पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन लोकल ट्रेन सकाळी १०.३३ वा. ते दुपारी ३.४९ वा. पर्यंत आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेलापूर-पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन फेऱ्या सकाळी ९.४५ वा. ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्ग बंद

पनवेल- ठाणे अप आणि डाऊन

पनवेल सकाळी ११.०२ वाजता ते दुपारी १५.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ वाजता ते दुपारी १५.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या रद्द  राहतील.

स्पेशल ट्रेन

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील.  ब्लॉक काळात ठाणे- वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...