राज्य सरकारविरोधात भाजप 20 हजार सभा घेणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात 20 हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

राज्य सरकारविरोधात भाजप 20 हजार सभा घेणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा
Chandrakant Patil
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 7:32 PM

मुंबई : महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात 20 हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. या सभांद्वारे व्यापक जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसेच या सभांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका होऊ नये म्हणून सर्व निर्बंध पाळून अभियान राबवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. ते भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते (Chandrakant Patil declared 20 thousand meetings in Maharashtra against MVA government).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. चुकीच्या वीज बिलांमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे, या व अशा अनेक मुद्द्यांबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या अभियानात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 20 हजार शक्तिकेंद्रांच्या माध्यमातून 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यात येतील. कोरोनामुळे आलेले सर्व निर्बंध पाळून हे अभियान राबविले जाईल.”

“आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण”

“महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे. तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे,” असे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलेत.

मंत्र्यांना प्रोटेक्शन 

कॉन्स्टेबलला मारहाण असो, कुणाचा जावई ड्रग्ज कनेक्शमध्ये आहे, कुणाचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्याप्रकरणात आलंय, कुणाला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तर कुणाला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मुले होतात… ही यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रात असं सर्व सुरू आहे. कोणता ना कोणता गुन्हा मंत्र्याशी जोडला गेला आहे आणि या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंत्र्यांना प्रोटेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय नेतेच काहीही करतात तर आपण केलं तर काय बिघडलं अशी जनतेची मानसिकता होत आहे, असं ते म्हणाले.

हम करे सो कायदा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे राजकारण समाजकारणाचं माध्यम आहे. कायदे करण्याचं माध्यम आहे. पण इथे या, गुन्हे करा आणि राजकीय नेते असल्याने तुम्ही अशा प्रकरणातून बाहेर पडू शकता. तुमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, असं सगळं सध्या राज्यात सुरू आहे. राज्यात हम करे सो कायदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

8 मार्च रोजी महिलांकडून निषेध

8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी भाजपच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या काळी साडी किंवा काळा ड्रेस परिधान करून किंवा काळी फित लावून सरकारचा निषेध नोंदवणार आहे. राज्यात आम्ही असुरक्षित आहोत, हे सरकारला दाखवण्यासाठीच भाजपच्या महिला पदाधिकारी काळी फित लावून सरकारचा निषेध नोंदवणार आहे.

हेही वाचा : 

कुणालाच कुणाचा धाक नाही, राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू; चंद्रकांतदादांची टीका

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

आपल कोणीच काही वाकड करू शकत नाही हे सगळ राज्यातल चित्र ह्या सरकारनं उभ केलय – चंद्रकांत पाटील

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil declared 20 thousand meetings in Maharashtra against MVA government

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.