AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या परदेश प्रवासाबाबत मोठी अपडेट, ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत पारपत्राचे नुकसान, न्यायालयाचा आदेश काय?

Chhagan Bhujbal Passport Case : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या परदेश प्रवासाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ईडी कार्यालयला लागलेल्या आगीत त्यांचे पारपत्र खराब झाले होते. आता न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या परदेश प्रवासाबाबत मोठी अपडेट, ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत पारपत्राचे नुकसान, न्यायालयाचा आदेश काय?
भुजबळांना मोठा दिलासाImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 06, 2025 | 8:36 AM
Share

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पारपत्राविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. ईडी कार्यालयाला मध्यंतरी आग लागली होती. त्यावेळी त्याच्यात अनेक कागदपत्रांचे नुकसान झाले होते. छगन भुजबळ यांच्या पारपत्राचे, पासपोर्टचे सुद्धा त्यात नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांच्या परदेश प्रवासावर प्रश्नचिन्ह तयार झाले होते. याप्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी झाली असता, भुजबळांना मोठा दिलासा मिळाला. काय आहे हे प्रकरण?

आगीत भुजबळांच्या पासपोर्टचे नुकसान

ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत भुजबळांच्या पारपत्राचे नुकसान झाले होते. २७ एप्रिल रोजी दक्षिण ‘कैसर-ए-हिंद’ इमारतीत भीषण आग लागली होती. या इमारतीत ईडीचे कार्यालय आहे ,ही आग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणण्यात आली होती. त्यात इतर कागदपत्रांसह भुजबळांच्या पारपत्राचे नुकसान झाले होते. ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर भुजबळांना पारपत्र परत केले होते. पण ते भिजलेले आणि फाटलेले होते. त्यामुळे त्यांच्या परदेश प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

भुजबळांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ

मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी न्यायालयाकडून दिलेल्या परवानगीची मुदत वाढवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात लागलेल्या आगीत त्यांच्या पारपत्राचे नुकसान झाले होते. २९ एप्रिल रोजी विशेष न्यायालयाने भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी परवानगी दिली होती आणि ईडीकडे जमा केलेले पारपत्रही परत करण्यात आले होते. १३ मे रोजी त्यांना मिळालेले पारपत्र भिजलेले आणि फाटलेले होते.

या घटनेनंतर नवीन पारपत्रासाठी त्यांनी तत्काळ अर्ज केला होता. नवीन पारपत्र उशीरा मिळाल्यामुळे त्यांना २२ मे रोजी व्हिसा मिळाला. व्हिसा २८ मेपासून वैध आहे. त्यामुळे ते मूळ नियोजनानुसार २४ मे ते ८ जून या कालावधीत प्रवास करू शकले नाहीत. त्यांनी २८ मे रोजी प्रवास सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिली. या अनपेक्षित घटनेमुळे भुजबळ यांनी प्रवासाची मुदत १२ जूनपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती. त्यांना विशेष न्यायालयाने दिलासा दिला. मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी न्यायालयाकडून दिलेल्या परवानगीची मुदत वाढवण्यात आली आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.