CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का? शिंदे म्हणतात आदर नक्कीच आहे…

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी राजकारणात पातळी सोडून काम करणारा माणूस नाही. विरोधी पक्षातील जे कुणी नेते असतील त्यांचाही मी आदर करत आलो आहे. त्यामुळे आता यावर मी अधिक काही बोलणं उचित होणार नाही, योग्यवेळी काही गोष्टी आवश्यकता भासल्यास स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का? शिंदे म्हणतात आदर नक्कीच आहे...
पुन्हा एकत्र येणार का?
दिनेश दुखंडे

| Edited By: महादेव कांबळे

Jul 02, 2022 | 1:36 AM

मुंबईः राज्यातील बंडखोरी नाट्य ज्या मुंबईपासून सुरू होऊन सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा झाला असला तरी त्याचा शेवट गोड झाल्यासारखाच झाला. मात्र त्याला त्या बंडखोरी नाट्याला खंत असल्याच्या भावनेचीही एक झालर आहे. कारण ज्या सामान्य शिवसैनिकांना (Shivsainik) शिवसेनेने पद प्रतिष्ठा दिली त्याच शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखाच्या मुलग्याला मुख्यमंत्री पदावरून हटवल्याची पाप बंडखोरांवरच असल्याची भावना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची मुलाखत घेतल्यानंतर पहिल्यांदाच टीव्ही नाईनच्या दिनेश दुखंडे यांच्याशी संवाद साधला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना त्यांनी शिवसेना, शिवसैनिक, आमदार, बंडखोरी आणि नंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेविषयी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपल्या मनात काय भावना आहे ते त्यांनी सांगितले आहे.

 ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का?

यावेळी त्यांनाउद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का असं ज्यावेळी सवाल करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्याविषयी मला आदर आहे.

पातळी सोडून काम करणारा माणूस नाही

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी राजकारणात पातळी सोडून काम करणारा माणूस नाही. विरोधी पक्षातील जे कुणी नेते असतील त्यांचाही मी आदर करत आलो आहे. त्यामुळे आता यावर मी अधिक काही बोलणं उचित होणार नाही, योग्यवेळी काही गोष्टी आवश्यकता भासल्यास स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी ट्विटरवरुन अभिनंदन केले

यावेळी त्यांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजही उद्धव ठाकरेसाहेबांबद्दल मला आदर आहे. त्यांनी जो राजीनामा दिला त्यामुळे आम्हाला आनंद झाला असं कुणीही मानण्याचं कारण नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें