
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. CID ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्र समोर आली नि महाराष्ट्रात आगडोंब उसळला. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात आला. अजितदादांसह सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे पालूपद लावले. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण पुढे केले. त्यावरून वाद ओढावला. आज टीव्ही ९ च्या तिसर्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत, अधिकृतपणे या वादावर पडदा टाकला. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये टीव्ही ९ तिसर्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये टीव्ही ९ मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि टीव्ही भारत वर्षचे सीनिअर अँकर गौरव अगरवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यांनी राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत अनेक विषयांवर प्रश्न विचारले. अनेक यॉर्क बोलला सुद्धा फडणवीस यांनी खुबीने उत्तरं दिली. त्यांचे एकूणच...