AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

Devendra Fadnavis Meets PM Modi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तर आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट... फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी Image Credit source: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटर हँडलवरून
| Updated on: May 28, 2026 | 1:17 PM
Share

Devendra Fadnavis Meets PM Modi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विकासावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही फडणवीसांनी पंतप्रधानांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी ट्वीट करून दिली. सध्या राज्याचे तीनही शिलेदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्र्यांचं ट्वीट काय?

“आमचे नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार.” असे ट्वीट एक्स हँडलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री दिल्लीत मुक्कामी

राज्यात कांदा प्रश्न चिघळला आहे. शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा नाराज आहेत. अनेक साखर कारखान्यांनी सध्याच्या काही धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरून तीनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा सुरू आहे. राज्यात एकूणच अनेक घडामोडी घडत आहेत.

राज्यातील काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह काही मंत्री काल दिल्लीत पोहचले. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीत कांदा आणि ऊस या प्रमुख पिकांचा खरेदी दर, निर्यात बंदी आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मागण्यांविषयी अनुकूल असल्याचे समोर आले आहे. येत्या दहा दिवसात याविषयीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा