शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! दुष्काळ कधी जाहीर करणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीन दिवसात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की, महाराष्ट्र सरकार तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना काढणार आहे. कर्नाटकने केवळ काही तालुक्यांसाठी अधिसूचना काढल्याचे स्पष्ट करत, फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफच्या मदतीची वाट न पाहता तातडीने उपाययोजना केल्या जातील.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! दुष्काळ कधी जाहीर करणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीन दिवसात...
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 2:26 PM

कर्नाटकाने कोणताही दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यांनी काही तालुक्यांसाठी दुष्काळाची अधिसूचना काढली आहे. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनीच तसं जाहीर केलं आहे, असं सांगतानाच आपणही दुष्काळाबाबतची अधिसूचना तीन दिवसात काढणार आहोत, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एनडीआरएफची मदत येईल तेव्हा येईल. तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी मीडियाशी संवाद साधताना दिली.

कर्नाटकने दुष्काळ घोषित केला नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी एनडीआरएफच्या नियमाने कारवाई केली जाते. तेव्हाच तो दुष्काळ मानला जातो. पण त्याची आधीसूचना आधी काढतात. ती आपण तीन दिवसात काढणार आहोत. कर्नाटकाने काही तालुक्यांची अधिसूचना काढली आहे. कालच त्यांनी घोषणा केली आहे. दुष्काळाचं डेटा कलेक्शन सुरू आहे. आकडेवारी आल्यावर आम्ही दुष्काळाची आधीसूचना काढू असं कर्नाटकाच्या उपमुख्यत्र्यांनी जाहीर केलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फक्त दुष्काळ जाहीर करून…

केवळ दुष्काळ जाहीर करून चालत नाही. त्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात. त्याची व्यवस्था करावी लागते. आम्हीही तीन दिवसात पहिली अधिसूचना काढू. त्यानंतर इतर उपयायोजना सुरू करू. एनडीआरएफच्या नियमांचं पालन करत समांतर पातळीवर या गोष्टी करू. एनडीआरएफचे नियम संसदेने तयार केले आहेत. ते बदलले जात नाहीत. दरवेळी आपण शेतकऱ्यांना मदत करतो. एनडीआरएफच्या नियमांचं पालन करून आपण मदत घेत असतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.

दुष्काळी भागाची पाहणी करणार

यावेळी फडणवीस यांनी दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याचं जाहीर केलं. मी काही भागात जाणार आहे. पाहणी करणार आहे. काही मंत्र्यांनी बांधावर जाण्यास सुरुवात केली आहे. सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जातील. आमदारही जातील. फिल्डवर गेल्यावर परिस्थिती लक्षात येते आणि शेतकऱ्यांशी संवाद होतो. शेतकऱ्यांनाही काही तक्रारी, म्हणणं मांडण्याची संधी मिळते, असंही ते म्हणाले.

आधीच मदत जाहीर करू

आम्ही केंद्राकडे आर्थिक मदत मागणार आहोत. त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव देऊ. एनडीआरएफच्या नियमाने प्रस्ताव देऊ. मागच्या दुष्काळी आणि अवकाळी परिस्थितीत केंद्राच्या मदतीची वाट पाहिली नव्हती. केंद्राची मदत उशिरा मिळते. त्यामुळे आमचा प्रस्ताव जाईल. कायद्याच्या तरतुदी पूर्ण करून प्रस्ताव पाठवू. पण मदत येईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही आधीच शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा काय प्रक्रिया होती?

यावेळी त्यांनी विरोधकांना फटकारलं. मनात येईल ते आकडे सांगायचे काम सुरू आहे. यापूर्वी दुष्काळ झाला तेव्हा काय मदत मिळाली? त्यांचं सरकार असताना काय मदत मिळाली? तेव्हा मदत देण्याची काय प्रक्रिया होती? यापेक्षा वेगळी प्रक्रिया होती का? काही मागण्या मांडताना विरोधकांनी वस्तुस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठी मागण्या करणं योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us