मुंबई पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीची सफर करा; पहिला मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना!

आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेत आजपासून सर्वांनाच हेरिटेज वॉक करता येणार आहे. (cm uddhav thackeray and ajit pawar visit bmc for heritage walk)

मुंबई पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीची सफर करा; पहिला मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 7:23 PM

मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेत आजपासून सर्वांनाच हेरिटेज वॉक करता येणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या हेरिटेज वॉकचा पहिला मान अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला. या हेरिटेज वॉकच्या निमित्ताने अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बऱ्याच वर्षानंतर महापालिकेत आले होते. त्यामुळे या हेरिटेज वॉकच्या सोहळ्यापेक्षा अजितदादा पालिकेत आल्याचीच सर्वाधिक चर्चा होती. (cm uddhav thackeray and ajit pawar visit bmc for heritage walk)

गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केल आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्य मंत्री आदिती ठाकरे हे सांयकाळी 5.30 वाजताच महापालिकेत हजर झाले. त्यानंतर बरोबर 5.40 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालिकेत आले. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह हे सुद्धा उपस्थित होते.

अजितदादा पालिकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे बऱ्याच वर्षानंतर पालिकेत आले होते. त्यामुळे अजितदादा पालिकेत आल्याचं सर्वांनाच कुतुहूल वाटत होतं. अजितदादा काय बोलतात याकडे माध्यमांचं लक्ष लागलं होतं. महापालिका सभागृहाजवळ उभे राहून अजितदादा पालिकेचा कोपरा न् कोपरा न्याहळत होते. पालिकेचं बांधकाम पाहून काही प्रश्नही विचारत होते. हेरिटेज गॅलरीकडे जाताना अजितदादांनी पालिकेच्या भल्या मोठ्या दरवाजाला हात लावून या दरवाज्याच्या मजबुतीचा अंदाजही घेतला.

आदित्य ठाकरेंकडून ब्रिफिंग

अजितदादा, थोरात आणि आदित्य ठाकरे पालिकेत लवकर आले होते. मुख्यमंत्र्यांना पालिकेत यायला थोडा अवकाश होता. त्यामुळे पालिका सभागृहाच्या बाहेरील पाऱ्यांवर थांबून अजितदादा पालिकेची पाहणी करत होते. पालिकेचे दरवाजे, मजबूत दगडी भिंती, मोठमोठे जुने झुंबर आणि पालिकेचा घुमट अजितदादा पाहात होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना ब्रिफिंग करण्यास सुरुवात केली. पालिकेचा इतिहास आणि बांधकामाबाबतची थोडक्यात माहिती देताना आदित्य दिसत होते.

नेत्यांचा हेरिटेज वॉक

मुख्यमंत्र्यांचं पालिकेत आगमन झाल्यानंतर सर्वच नेते पालिकेच्या गॅलरीत गेले. या नेत्यांनी पालिकेत हेरिटेज वॉक केला. पालिकेच्या मुख्य गॅलरीत येऊन हे नेते थांबले. काही काळ त्यांनी पालिकेच्या या प्रेक्षणीय गॅलरीत उभं राहून गप्पाही मारल्या.

अशी आहे इमारत

महापालिका इमारत गॉथिक शैलीतील आहे. ही चार मजली इमारत दगडी कामातून तयार झाली आहे. ही इमारत जागतिक वारसा यादीत येते. या इमारतीच्या बाजूलाच पालिकेची सहा मजली विस्तारीत इमारत आहे. महापालिकेत पालिका आयुक्त, महापौर, चार अतिरिक्त आयुक्त, गटनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विविध खात्यांची दालने आहेत. तसेच महापालिका सभागृह हे या इमारतीचं मुख्य आकर्षण आहे. पालिका सभागृहात विविध महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांना पाहता येणार आहेत.

हेरिटेज वॉकसाठी गाईडही

पालिकेने हेरिटेज वॉक सुरू करून हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला केला आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे. त्यासाठी एक गाईडही ठेवण्यात आला आहे. या गाईडच्या मदतीने पर्यटकांना या इमारतीचा इतिहास जाणून घेता येणार आहे.

काय पाहता येणार?

पालिकेची मुख्य इमारत इमारतीतील विविध दालने इमारतीसमोरील फिरोजशहा मेहता यांचा पुतळा तसेच इमारतीसमोरी सेल्फी पॉईंट

महापालिका इमारती विषयी थोडक्यात

मुंबई महापालिकेची इमारत 31 जुलै 1893 मध्ये उभारण्यात आली. या इमारतीच्या बांधकामाला 25 एप्रिल 1889मध्ये सुरुवात झाली होती. गॉथिक वास्तुकलेनुसार ही इमारत बांधली आहे. फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या वास्तू शिल्पकारांने या इमारतीला पौर्वात्य वास्तूशिल्पाची जोड देऊन या इमारतीला आगळंवेगळं रुप दिलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ त्रिकोणी आकाराच्या जागेत ६६००.६५ चौरस वार जमिनीवर तत्कालीन सहायक अभियंता रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली ही इमारत उभारण्यात आली आहे. जमिनीपासून या इमारतीच्या सर्वोच्च टोकापर्यंतची उंची २३५ फूट आहे. या अतिभव्य आणि देखण्या इमारतीचा जागतिक वारसा यादीतही समावेश करण्यात आलेला आहे.

पालिका इमारतीची ठळक वैशिष्ट्येः

>> मुंबई महानगरातील सुमारे दीड कोटी लोकसंख्येला नागरी सेवा-सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण. >> ही इमारत म्हणजे मुंबई महानगराच्या नागरी सेवेचा व विकासाचा अबोल साक्षीदार आहे. >> भारतातील अग्रगण्य शहर (Urbs Prima In Indis) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगराचे प्रतिनिधीत्व या इमारतीचा 235 फूट उंचीचा मनोरा करीत आहे. >> फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तुशिल्पकाराकडून मुख्यालय इमारतीचे संकल्पनाचित्र व आराखडे तयार. >> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे कायदे बनविणारे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांनी त्यावेळी इमारतीची कोनशिला बसवली. >> दिनांक 25 एप्रिल 1889 रोजी बांधकामास प्रारंभ. दिनांक 31 जुलै 1893 रोजी पूर्णत्वास. >> तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या 6600.65 चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. >> रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली बांधकाम पूर्ण. ठेकेदार व्यंकू बाळाजी कालेवार यांनी अपेक्षित कालावधीत काम पूर्ण केले. >> इमारत बांधकामाचा खर्च रुपये 11 लाख 19 हजारv969 इतका झाला. मूळ अंदाजित खर्च रुपये 11 लाख 88 हजार 092 रुपयांच्या तुलनेत 68 हजार 113 रुपये इतका कमी खर्च झाला. बांधकाम पूर्ण करुन शिल्लक रक्कम सरकारजमा करण्यात आली. >> ही सर्वांगसुंदर व भव्य अशी इमारत गॉथिक वास्तूशास्त्र पद्धतीने बांधलेली आहे. त्यात पौर्वात्य व पाश्चात्त्य स्थापत्य कलेचा मनोहारी संगम. ठिकठिकाणी त्याचा प्रत्यय. >> या इमारतीमध्ये दिनांक 16 जानेवारी 1893 रोजी प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ. >> मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 प्रमाणे याच इमारतीतून कामकाज सुरु. >> मुख्यालयात सुमारे 68 फूट लांब, 32 फूट रुंद, 38 फूट उंचीचे ऐतिहासिक सभागृह हे आकर्षणाचा भाग. सभागृहात दोन प्रेक्षक दालनांचाही समावेश. तसेच तीन मोठी झुंबरही. >> सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिकेत नागरी हक्कांसाठी झगडत मुंबई महानगराच्या विकासाला दिशा देणारे असे सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा दिनांक 23 एप्रिल 1923 रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर स्थापन. >> इमारतीचे मूळ स्वरुप आजही कायम. अंतर्गत रचना बदलताना मूळ स्वरुपाला कोणताही धक्का न लावता प्रयत्नपूर्वक या इमारतीचे बांधकाम व सौंदर्य जपण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

LIVE | मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित

15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.