AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत लष्कर येणार नाही, जे करेन ते तुम्हाला सांगून करेन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (8 मे) जनतेशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली (CM Uddhav Thackeray on Army in Mumbai amid Corona).

मुंबईत लष्कर येणार नाही, जे करेन ते तुम्हाला सांगून करेन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: May 08, 2020 | 9:51 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (8 मे) जनतेशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली (CM Uddhav Thackeray on Army in Mumbai amid Corona). यावेळी त्यांनी मुंबईत लष्कर येणार या चर्चेवरही आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत लष्कर येणार ही केवळ अफवा आहे. जे करेल ते तुम्हाला सांगून करेल. सध्या मुंबईत लष्कराची गरज नाही, ते मुंबईत येणार नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी भविष्यात लष्कराची गरज पडली तर केंद्राकडून मागणी केली जाईल, असंही सूचकपणे सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या दोन तीन दिवस मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही एक अफवा आहे. मुंबईत लष्कर येणार, मग लॉकडाऊन होणार आणि सर्व दुकानं बंद होणार असं बोललं जात आहे. मात्र, लष्कर कशाला पाहिजे? आजपर्यंत जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन सांगून केलं आहे. मी तसंच करणार आहे. आपल्याकडे आपण लॉकडाऊन करताना टप्प्याटप्प्याने करत गेलो. पहिल्यांदा काही गोष्टी बंद केल्या, मग नंतर काही गोष्टी बंद केल्या. असं करत करतच आपण पुढे गेलो. त्यामुळे मुंबईत लष्कराची काहीही गरज नाही.”

मी तुम्हाला माझ्या पहिल्या भेटीतच सांगितलं आहे की या लढाईत आपण सर्वजण हेच जवान आहात. ते जे जवान आहेत ते सीमा सांभाळत आहेत. हे कोरोनाचं युद्ध आपल्याला लढायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते लढत देखील आहात. संयमाच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे युद्ध तुम्ही लढता आहात. लष्कराची आवश्यकता नाही. मुंबईत लष्कर येणार नाही. पण आपण एक काळजी देखील घेत आहोत. पावसाळ्यात मुंबईच्या पावसाने त्रेधातिरपीट उडते. त्यामुळे राज्यात केंद्राच्या रेल्वे, बीपीटी, मिलिट्री या यंत्रणा आहेत. त्यांचे हॉस्पिटल्स आणि डॉक्टर वापरण्याची केंद्र सरकारला विनंती केली. ती मान्य झाली आहे. हे करणं गैर नाही. पुढचा धोका उद्धवू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“पोलिसांना विश्रांती देण्यासाठी गरज पडली तर केंद्राकडे मनुष्यबळ मागू”

उद्धव ठाकरे यांनी थेट लष्कर बोलावू असा उल्लेख केला नसला, तरी त्यांनी सुचकपणे आवश्यकता असेल तेव्हा लष्कराला बोलावू असंही सांगितलं आहे. ते म्हणाले, “पोलिसांना अधिकची विश्रांती देण्याची गरज लागली तर टप्प्याटप्प्याने त्यांना विश्रांती देण्यासाठी अधिकचं मुनष्यबळ लागलं तर आपण केंद्राकडे त्याची मागणी करु. काही पोलीस आजारी पडले तर त्यांना बरं होण्याची तरी वेळ द्यायला हवी. त्याचा थकवा तरी गेला पाहिजे. ते अधिकचं मनुष्यबळ बोलावलं म्हणजे लष्कर बोलावलं असं नाही. पोलिसांना विश्रांती देण्यासाठी गरज लागली तर आपण अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार आहोत. यावेळी तुमच्या मनात भीती किंवा गैरसमज असू नये, म्हणून मी तुम्हाला आज हे मुद्दाम सांगतो आहे.”

डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, महसूल यंत्रणा, पोलीसही आहेत या सर्व यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहेत. पोलीस तर पहाऱ्यासाठी उभं राहून थकून जात आहेत. काही आजारी पडत आहेत. काही पोलीस तर अगदी मृत्यूमुखी पडले. ते आपल्यासाठी लढताना मृत्यूमुखी पडले आहेत. ते आपल्यासाठी आजारी पडत आहेत. ते तणावाखील त्यांना विश्रांती घ्यायला देखील वेळ मिळत नाही. तेही माणसं आहेत, त्यांनाही थकवा आहे. डॉक्टरही माणसं आहेत आणि पोलीसही माणसं आहेत. त्यांना आजारी पडल्यावरच बाजूला करणं हा क्रुरपणा ठरेल. त्यांनाही या दरम्यान विश्रांती देण्याची गरज आहे. त्यासाठी माझ्या मनात एक विचार आहे. मात्र, याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुंबईत असंच सुरु राहीलं, तर आर्मी बोलवावी लागेल, मग नागरिकांच्या अडचणी वाढतील : किशोरी पेडणेकर

CM Uddhav Thackeray Live | 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार?, मुख्यमंत्री म्हणतात…

ठाकरे सरकारला उत्तर देता येत नाही म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : किरीट सोमय्या

संबंधित व्हिडीओ :

CM Uddhav Thackeray on Army in Mumbai amid Corona

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.