जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 3:59 PM

मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान (CM Uddhav Thackeray On Corona) घातलं आहे. या विषाणूशी दोन हात करण्यासाठी राज्यसरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वी कधी नव्हे ती मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा आणि देशातील रेल्वेसेवा पूर्णपणे बंद (CM Uddhav Thackeray On Corona) करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपण जाऊ नये यासाठी राज्य सरकार मोठे निर्णय घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह प्रसारणातील महत्त्वाचे 9 मुद्दे

1. महाराष्ट्र पूर्णपणे लॉक डाऊन

2. आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू, 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर निर्बंध

3. देशात परदेशी विमानांना आज मध्यरात्रीपासून बंदी

4. लोकल सेवा बंद , रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद

5. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक (CM Uddhav Thackeray On Corona) कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील

6. अन्न-धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकानं सुरुच राहातील

7. बँका, वित्तीय संस्था सुरुच राहातील

8. शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, जमेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं

9. सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

“उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेनेपार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“सरकारी कर्मचारी संख्या 25 वरुन 5 टक्क्यांवर आणली आहे. केवळ 5 टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरं, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजेनंतर घराबाहेर पडू (CM Uddhav Thackeray On Corona) नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.