AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : कॉमेडी स्टार राजपाल यादवच्या 6 वर्षीय मुलीकडून ‘Save Aarey’ चा नारा

मेट्रो प्रकल्प तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील (Save Aarey) 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या या निर्णयाला मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन याचा निषेध केला.

VIDEO : कॉमेडी स्टार राजपाल यादवच्या 6 वर्षीय मुलीकडून 'Save Aarey' चा नारा
| Edited By: | Updated on: Sep 09, 2019 | 8:56 AM
Share

मुंबई : मेट्रो प्रकल्प तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील (Save Aarey) 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या या निर्णयाचा मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. त्यासोबतच कॉमेडी स्टार राजपाल यादव (Rajpal yadav) आणि त्याच्या 6 वर्षाच्या मुलीनेही पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला. राजपाल यादव याने सोशल मीडियावर आपल्या मुलीचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सेव्ह आरेचा नारा दिला आहे.

आरे वाचवा मोहीमेत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसह (Shraddha Kapoor) अनेक सेलिब्रिटिंनीही पाठिंबा दिला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे (Amit thackeray) यांनीही आरेतील झाडे वाचवण्यासाठी जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे.

नुकतेच मुंबईकरांनी मानवी साखळी करुन आरे वाचवण्यासाठी सरकारला साकडं घातलं. आरेच्या जंगलात साडे चार लाखांपेक्षा जास्त झाडे असून हे अनेक प्राणी-पक्षी प्रजातींसाठी हक्काचं घर आहे. या झाडांसोबतच या जीवांचंही अस्तित्व संपुष्टात येईल यात शंका नाही. त्यामुळे या जंगलाची जैवविविधताच संपुष्टात येणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

मुंबईचं फुफ्फुस असलेलं आरे जंगल भविष्यातील पिढ्यांचीही महत्त्वाची संपत्ती आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचाही क्रमांक लागतो. मुंबईकरांना स्वच्छ श्वास द्यायचा असेल, तर झाडं तोडणं नव्हे, झाडांची संख्या वाढवणे हा पर्याय असल्याचं तज्ञांचं मत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.