AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस नगरसेवक नियाज वनू यांना अटक, 5 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन

काँग्रेस नगरसेवक नियाज वनू यांना सहार पोलिसांकडून अटक करण्यात आली. नंतर पाच हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना टेबल जामीनसुद्धा देण्यात आला. मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये घोटाळा होत आहे, असा आरोप केल्यामुळे मुंबई पालिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

काँग्रेस नगरसेवक नियाज वनू यांना अटक, 5 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 1:03 AM
Share

मुंबई : काँग्रेस नगरसेवक नियाज वनू यांना सहार पोलिसांकडून अटक करण्यात आली. नंतर पाच हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना टेबल जामीनसुद्धा देण्यात आला. मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये घोटाळा होत आहे, असा आरोप केल्यामुळे मुंबई पालिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केलं होतं.

नेमकं प्रकरण काय आहे ?

काँग्रेसचे नगरसेवक नियाज वनू यांनी कोरोना संसर्ग तपासण्यासाठी वारण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसंदर्भात मोठा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावर rt-pcr घोटाळा होत असल्याचा आरोप करून मुंबई पालिका प्रशासनाला घेरलं होतं. त्यानंतर वनू यांनी केलेल्या आरोपांचांचे खंडन करत महानगरपालिकेकडून त्यांच्याविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 पाच हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन

याच आरोपानंतर नियाज वनू यांना सहार पोलिसांनी अटक केलं होतं. नंतर वून यांना पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर टेबल जामीन देण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

 दिवसभरात 433 नागरिकांना कोरोनाची लागण 

दरम्यान मुंबईत  24 तासात 433 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525 आहे. मुंबईत आतापर्यंत 722096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर हा 97 टक्के असून सध्या मुंबईत 4438 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे असून रुग्णवाढीचा दर हा 0.06 टक्के आहे.

इतर बातम्या :

आमच्याकडे टोल नाक्यांवर तर काय-काय चालतं; भुजबळांची शिवसेना आमदार कांदेंवर शेलकी टीका

कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’

नाशिक विभागातील 2 हजार 63 तलाठी कार्यालयांची होणार झाडाझडती

(Congress corporator Niyaz Vanu bailed after arrest by mumbai police)

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.