कुटुंबासाठी शाळा सोडून चहाची विक्री; भायखळ्यातील सुभानच्या मदतीला मिलिंद देवरा सरसावले

कुटुंबासाठी शाळा सोडून चहाची विक्री; भायखळ्यातील सुभानच्या मदतीला मिलिंद देवरा सरसावले

लॉकडाऊनमुळे आईचा पगार येणं बंद झाल्यानं कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने एका 12 वर्षीय मुलाने शाळा सोडून चहाच्या टपरीवर चहा विक्रीचं काम सुरू केलं आहे.

भीमराव गवळी

|

Oct 30, 2020 | 6:26 PM

मुंबई: लॉकडाऊनमुळे आईचा पगार येणं बंद झाल्यानं कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने एका 12 वर्षीय मुलाने शाळा सोडून चहाच्या टपरीवर चहा विक्रीचं काम सुरू केलं आहे. सुभान असं या १४ वर्षीय मुलाचं नाव असून त्याच्या मदतीला काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा धावून आले आहेत. (congress leader milind deora appeals mumbaikars to help byculla poor boy)

सुभान हा भायखळा येथील झोपडपट्टीत राहतो. त्याचे वडिलांचे 12 वर्षापूर्वीच निधन झालं. त्याची आई शाळेत बस अटेंडंट म्हणून काम करते. पण लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने त्यांचा पगार येणं बंद झाला. घरी कमावणारं कोणीच नसल्याने त्यांची आर्थिक ओढताण सुरू झाली. त्यातच बहिणीची ऑनलाइन शाळाही सुरू होती. अशात करायचं काय? असा प्रश्न पडल्याने सुभानने शाळा थांबवून एका चहाच्या टपरीवर चहा विक्रीचं काम सुरू केलंय. घराचा खर्च चालवण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं. त्याबाबतची माहिती व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी तात्काळ सुभान आणि त्याच्या कुटुंबांशी संपर्क साधला.

शक्य तितकी आणि लवकरात लवकर मदत करण्याचं आश्वासन देवरा यांनी सुभानच्या कुटुंबीयांना दिलं आहे. तसेच सुभान आणि त्याच्या बहिणीचं शिक्षण होणं गरजेचं आहे. त्यासाठी कुणालाही शक्य झाल्यास +919892920886 या क्रमांकावर संपर्क साधून सुभानच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन देवरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केलं आहे. तर, शाळा सुरू झाल्यानंतर मी पुन्हा एकदा शाळेत जाईल, असं सुभानने म्हटलं आहे. (congress leader milind deora appeals mumbaikars to help byculla poor boy)

संबंधित बातम्या:

11वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय, तर राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार – वर्षा गायकवाड

कामगारांचे तीन महिन्याचे पगार थकले; एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार: अनिल परब

(congress leader milind deora appeals mumbaikars to help byculla poor boy)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें