AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : महाविकास आघाडीत फुटीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे संकेत, निर्णय घेताना विचारात घेतले नाही तर..

निर्णय घेताना विचारात घेतले जात नसेल तर, आघा़डीत राहायचे की नाही याचा विचार कारावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, एका विपरीत परिस्थितीत उभी राहिलेली आघाडी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Nana Patole : महाविकास आघाडीत फुटीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे संकेत, निर्णय घेताना विचारात घेतले नाही तर..
मविआत फुटीचे संकेत Image Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 11, 2022 | 2:11 PM
Share

औरंगाबाद – राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर, आता महाविकास आघाडीचे (MVA)भवितव्य काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळतो आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेत असतानाही, मविआतील तिन्ही घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress)यांच्यात फारशे सख्य नव्हतेच. कारभार शिवसेना आणि राष्ट्रवादी करते आहे आणि काँग्रेस अलिप्त असल्याची भावना होती. आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने परस्पर अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संतप्त झाले आहेत. निर्णय घेताना विचारात घेतले जात नसेल तर, आघा़डीत राहायचे की नाही याचा विचार कारावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, एका विपरीत परिस्थितीत उभी राहिलेली आघाडी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाराजीचे कारण काय ?

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्यानंतर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवे हते. मात्र शिवसेने अंबादास दानवे यांची निवड केली आणि त्यांच्या नियुक्तीचे पत्रच थेट दिले. त्यामुळे काँग्रेस नाराज झालेली आहे. हा निर्णय घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही विचारात घेतले गेले नसल्याने दोन्ही पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की- आमची नैसर्गिक आघाडी नाही. ही आघाडी विपरीत परिस्थितीत झालेली आहे. राज्याच्या जनतेच्या हितासाठी त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनि्या गांधी यांनी आघाडी करणअयाचा निर्णय घेतला. आम्ही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा जनमताचा कौल होता, त्याचा आदर करुन आम्ही विरोधात बसणार होतो. ही मानसिकता होती. यांनी पहाटेचा शपथविधी केला. २०१९ पासून राज्यात महाभारत घडते आहे. महाराष्ट्राची बदनामी भाजपा करते आहे. राज्याने यांना पहिल्यांदा १०५ भाजपाचे आमदार निवडून दिले पण यांनी लोकशाहीचा तमाशा करण्याचे काम केले आहे. यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विपरीत परिस्थितीत आमची आघाडी झाली होती, ही काही नैसर्गिक आघाडी नाही. असे सांगत त्यांनी मविआत फुटीचे संकेत दिले आहेत.

पक्षाचा निर्णय मान्य असेल – अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांचा निर्णय पक्षाचा असतो. त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्य असेल. असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. विधिमडंळ गटेनेते बाळासाहेब थओरात आहेत. पटोले आणि थोरात जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मोठे पक्ष असल्याने अनेक जण प्रतिक्रिया देत असतात

मोठे पक्ष असल्याने अनेक नेते प्रतिक्रिया देत असतात असे वक्तव्य विरोधी पक्षनते अजित पवार यांनी केले आहे. सद्यस्थितीत विधिमंडळात काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आहेत. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत अशोक चव्हाण आणि अमिन पटेल आहेत. या ठिकाणी विरोधकांमध्ये सामंजस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस प्नदेशाध्यक्ष प्रतिक्रिया टाळली

नाना पटोले यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी पटोले यांचे वक्तव्य ऐकले नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांच्या निवडीबाबत विचारात घेतले नाही, याबाबत त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?