AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा हेड कोच आकिब जावेद यांच्या मुलीने थाटला संसार; फोटो समोर येताच लोकांकडून ट्रोलिंग, पण का?

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या हेड कोचच्या भूमिकेत असलेल्या आकिब जावेद यांच्या मुलीच्या फोटोवरून ट्रोलिंग सुरू आहे. उकबाचं लग्न लंडनमध्ये नुकतंच पार पडले. पण फोटोमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

पाकिस्तानचा हेड कोच आकिब जावेद यांच्या मुलीने थाटला संसार; फोटो समोर येताच लोकांकडून ट्रोलिंग, पण का?
पाकिस्तानचा हेड कोच आकिब जावेद यांच्या मुलीने थाटला संसार; फोटो समोर येताच लोकांकडून ट्रोलिंग, पण का?Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2026 | 10:39 PM
Share

पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांची मुलगी एका वेगळ्याच कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. उकबा आकिब हीचं लग्न नुकतंच पार पडलं. पण आता तिच्या लग्नाचा विषय चर्चेचा ठरला आहे. पाकिस्तानमध्ये यावरून रणकंदन माजलं आहे. तिच्या फोटोवरून लोकं ट्रोल करत आहे. तसेच फोटोखाली उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. उकबाने बेन क्रिस्टोफोराइड्ससोबत युनाइटेड किंगडममध्ये 9 ऑगस्टला प्रिय प्रेमविवाह केला. या विवाहानंतर आकिब यांची पत्नी फरजाना यांनी सोशल मीडियावर लग्नातील काही फोटो शेअर केले. तसेच फरजान आकिब यांनी उकबा आणि तिच्या पतीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”अल्हम्दुलिल्लाह. आमच्या मुलीचे लग्न 9 ऑगस्ट रोजी यूकेमध्ये झाले. हा प्रवास दोन्ही कुटुंबांसाठी आणि हृदयांसाठी आनंदाने भरलेला असो! आमेन.”, असे आशीर्वाद दिले. पण ट्रोलर्सच्या डोक्यात काही भलतंच होतं. त्यांनी उकबाचा फोटो पाहिले आणि ट्रोलिंग करण्यास सुरूवात केली.

फोटो आणि व्हिडीओत आकिब आपल्या मुलीला लग्नस्थळी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत उकबाच्या मैत्रिणीही आहेत. तिच्यासह मैत्रिणींनी वेस्टर्न कपडे परिधान केले आहेत. पण पाकिस्तानी ट्रोलर्संना उकबाचा पेहराव काही आवडला नाही. उकबाने हात आणि खांद्यावर टॅटू गोंदल्याने त्यांच्या संतापात आणखी भर पडली. मुस्लिम संस्कृती आणि परंपरांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पाकिस्तान कट्टरतावाद्यांनी आकिब जावेद आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

आकिब जावेदही ट्रोलर्सच्या निशाण्यावर

पाकिस्तानचे हेड कोच आकिब जावेद यांनाही ट्रोलर्संनी निशाण्यावर घेतलं आहे. एका युजर्सने तर पाकिस्तान संघाचे संचालक आणि हेड कोच असूनही धार्मिक संस्कार शिकवले नाहीत का? असा प्रश्न विचारला आहे.

उकबा काय करते?

उकबाचं शिक्षण ब्रिटेनमध्ये झालं आहे. तिने ससेक्स विद्यापीठातून मिडिया आणि आंतरराष्ट्रीय मिडियात पदवी मिळवली आहे. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मीडिया, जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता क्षेत्रात व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. तिची आई फरजाना आकिब या देखील पाकिस्तानमधील एक नामांकित लेखिका आणि कवी आहेत. त्यामुळे उकबाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शैक्षणिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी