400 मुलांच्या धर्मांतर प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक, धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन काय?

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून 400 मुलांचे धर्मांतर केल्याचा दावा केला जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहे.

400 मुलांच्या धर्मांतर प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक, धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन काय?
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 5:11 PM

विजय गायकवाड, मुंबई : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गाझियाबादमधील मशिदीचा मौलवी अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अब्दुल रहमानने अल्पवयीन मुलांवर कट्टरतावाद केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचे धागेदोरे मुंब्रापर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी रहमान याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दुसरा आरोपी हा ठाण्यातील मुंब्रा येथील आहे. यामुळे गाजियाबादची एक टीम मुंब्रामध्ये दाखल झाली. स्थानिक मुंब्रा पोलिसांच्या मदतीने शहानवाज नामक आरोपीचा शोध सुरु झाला. हाच शहानवाज गेल्या आठ दिवसांपासून आपल्या घरी येत नसल्याचं आजूबाजूच्या सर्वच शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

काय म्हणतात जितेंद्र आव्हाड

गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचा प्रकारावर बोलताना जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. ते म्हणाले की, 400 मुलांचे धर्मातंर प्रकरण म्हणजे मुंब्राला बदनाम करण्याचे काम आहे. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. या माध्यमातून शहराला बदनाम केले जात आहे. ही घटना खरी नाही. या घटनेचे खंडन पोलिसांनी करायला हवे. राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. धर्मांतर करणारी चार मुले दाखवली तरी आपण राजीनामा देऊ, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकार

गाझियाबादमधील कविनगर येथील १७ वर्षीय मुलाचे धर्मांतर करणाऱ्या मौलवी अब्दुल रहमान उर्फ ​​नन्नी याला पोलिसांनी अटक केली आहे. रहमान याने ऑनलाइन गेमच्या माध्यमातून धर्मपरिवर्तन घडवल्याचा आरोप आहे. अब्दुल रहमान आणि ठाणे मुंब्रा येथील शाहनवाज मकसूद यांनी हा प्रकार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कसे फसवत होता

शहनवाज मकसूद हा बड्डो नावाच्या बनावट आयडीद्वारे ऑनलाइन गेमवर उपस्थित राहत होता. फोर्ट नाईट या ऑनलाइन गेममध्ये हिंदू मुलांना फसवण्याचे काम तो करत होता. हिंदू नावांची मुस्लीम मुलांचे आयडी बनवून तो स्वत: खेळत होता. खेळ खेळताना हिंदू मुले हरले की मग खरा खेळ सुरू होतो.

सुरु होत होते षडयंत्र

मुलगा हरल्यावर त्याला कुराण वाचण्यास सांगत होता. मुलगा कुराण वाचून खेळ केल्यावर तो जिंकत होता. याप्रकारे मुलाचा कल मुस्लिम धर्माकडे होत होता.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.