मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा, लसीकरणाचा वेग मंदावला

लस तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा, लसीकरणाचा वेग मंदावला
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:44 AM

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार यांसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे कोरोना लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले अनेक नागरिक हैराण झाले आहेत.

जुलैमध्ये तीन आठवड्यात तीनदा लसीकरण केंद्र बंद

कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेतील बहुतांश रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना लसींचा तुटवडा असल्याने मुंबई महापालिकेने आज बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेला गेल्या शुक्रवारी 45 हजार लसमात्रा मिळाल्या होत्या. मात्र पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झाले. त्यामुळे हा लससाठा मंगळवारपर्यंत वापरण्यात आला. मंगळवारी आणखी लससाठा मिळणे अपेक्षित होते. पण, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाली नाही. त्यामुळे आज अखेर पालिकेने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लस तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

वसई-विरार महापालिकेत लसीकरण केंद्र बंद

तसेच वसई विरार महापालिका हद्दीत आज दिवसभरासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीत 16 जुलैपर्यंत 2 लाख 95 हजार 992 जणांनी लस घेतली आहे. यातील 2 लाख 25 हजार 811 जणांनी पहिला डोस तर 65 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

वसई विरार महापालिकेत ज्यानुसार लसीचा साठा उपलब्ध होतो, तसे महापालिका लसीकरण केंद्रावर लस पुरवठा केल्या जात आहे. काल लसीकरणाचा साठा शासनाकडून आला नसल्याने हे लसीकरण बंद ठेवले आहेत.
केडीएमसीत 25 लसीकरण केंद्र बंद
कल्याण डोंबिवली महापालिकेत लस उपलब्ध नसल्याने सर्व 25 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला नागरिकांचे लसीकरण सातत्याने सुरु होते. मात्र काही दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने वारंवार महापालिकेला आपल्या लसीकरण केंद्र बंद करावा लागत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून 3 लाख 73 हजार लस देण्यात आले आहेत.

(Corona vaccine shortage in many places Mumbai, Thane, Kalyan Dombivali vaccination center closed)

संबंधित बातम्या : 

राज्यभरात गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्री, एफडीएची धडक कारवाई, 14 गुन्हे दाखल, तर 11 जणांना अटक

लस साठ्याअभावी उद्या मुंबईत शासकीय, मनपा केंद्रांवर लसीकरण बंद

20 मीटर उंच, 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता, नागपुरात देशातील सर्वात मोठा ऑक्सिजन टॅंक

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.