AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहिसर पू. ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्र. ९ चे काम ९५ टक्के पूर्ण, गाठला एक महत्त्वपूर्ण टप्पा

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे.

दहिसर पू. ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्र. ९ चे काम ९५ टक्के पूर्ण, गाठला एक महत्त्वपूर्ण टप्पा
Updated on: Jun 13, 2025 | 9:51 PM
Share

मेट्रो मार्गिका मार्ग क्रमांक ७ ची एक्स्टेंशन असलेली दहिसर पू. ते मीरा -भाईंदर मेट्रो मार्गिका ९ चे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचा दहिसर पूर्व ते भाईंदर पश्चिम दरम्यान जोडला जाणारा एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. भायंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील [ROB] अत्यंत वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा स्टीलचा गर्डर यशस्वीरित्या स्थापण करण्यात एमएमआरडीएला यश आले आहे.

भाईंदर पश्चिम वाहन उड्डाण पुलाजवळील अत्यंत किचकट आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टीलचे गर्डर टाकण्यात यश मिळाले आहे. हे काम रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमध्ये अचूक समन्वय साधत पूर्ण करण्यात एमएमआरडीए यश आले आहे. ६६०७ कोटी रुपयांच्या या मार्गिकेचे काम रखडले आहे. या मार्गावर आठ डब्याच्या ट्रेन धावणार असून त्याची क्षमता २३५३ प्रवासी आहे.

 मार्ग क्रमांक ७ ची एक्स्टेंशन

दहिसर (पू) ते मीरा-भाईंदर ( सर्व उन्नत )  मेट्रो मार्ग क्र.९ या मार्गिकेवर एकूण आठ स्थानके असणार आहेत. त्यात खालील स्थानकांचा समावेश आहे.

1. दहिसर,

2. पांडुरंग वाडी,

3. मिरागाव,

4. काशीगाव,

5. साई बाबा नगर,

6. मेदितिया नगर,

7. शहीद भगतसिंग गार्डन,

8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम

अंधेरी (E) ते CSIA विस्तार

1. विमानतळ कॉलनी (एलिव्हेटेड)

2. CSIA (भूमिगत)

🔹 लांबी – १०.५४ किमी | स्थानके – ८ उन्नत | एकूण प्रगती – ९५%

🔹 गर्डर माप – ६५ मीटर लांब, ९.५७५ मीटर रुंद, सुमारे ७०० मेट्रिक टन वजन

🔹 गर्डर रचना – ३ भागांमध्ये (प्रत्येकी सुमारे २३५ मेट्रिक टन वजन, ३ मीटरहून अधिक खोल )

🔹 कार्यक्षेत्र – भाईंदर पश्चिम, पश्चिम रेल्वे मार्गावर (अतिशय अरुंद आणि दाट लोकवस्तीचा भाग)

🔹 अंमलबजावणी – ७, ८ आणि ११ जून २०२५ रोजी रात्री १.५ तासांच्या ब्लॉकमध्ये

🔹 साधने – ६०० मेट्रिक टन व ७५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन्स वापरले; ६०० मेट्रिक टनची एक राखीव क्रेन

🔹 सहकार्य – पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि वाहतूक पोलिसांचे मोलाचे सहकार्य

🔹 संचालन उद्दिष्टे –

• टप्पा १: दहिसर (पूर्व) – काशिगाव (डिसेंबर २०२५)

• टप्पा २: काशिगाव – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (डिसेंबर २०२६)

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.