मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra- karnataka Border issue) कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit pawar) यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (DCM Laxman Savadi) यांना चांगलंच झापलं. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असा दावा करणाऱ्या लक्ष्मण सवदी यांना अजित पवारांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. सवदींनी केलेल्या विधानाला काही आधार नाही, काही तारतम्य नाही, अशा शब्दात त्यांनी सवदींना फटकारलं. (DCM Ajit pawar reply Laxman Savadi over maharashtr- karnataka Border issue)