दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश एनसीबीच्या चौकशीला गैरहजर; घरात सापडला ड्रग्जचा साठा

या दोघींमध्ये अंमली पदार्थांविषयी देवाणघेवाण झाल्याचे मोबाईल चॅटस समोर आले होते. | Karishma prakash

दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश एनसीबीच्या चौकशीला गैरहजर; घरात सापडला ड्रग्जचा साठा

मुंबई: काही दिवसांपूर्वीच अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाच्या (NCB) चौकशीला सामोरी गेलेली करिश्मा प्रकाश ही फरार असल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीने करिश्माला आज चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ती चौकशीला हजर राहिली नाही. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी ड्रग्जचा साठा आढळून आला. करिश्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर होती. या दोघींमध्ये अमली पदार्थांविषयी देवाणघेवाण झाल्याचे मोबाईल चॅटस समोर आले होते. यानंतर एनसीबीकडून करिश्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांची चौकशी करण्यात आली होती. (Deepika Padukone manager Karishma Prakash fled away)

प्राथमिक माहितीनुसार, करिश्मा प्रकाश हिला आज एनसीबीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, करिश्म प्रकाश या चौकशीसाठी गेली नाही. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून करिश्मा प्रकाशच्या घरावर धाड टाकण्यात आली. यावेळी करिश्माच्या घरातून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे समजते.

आज दिवसभर तिच्या घरी एनसीबीची कारवाई सुरु होती. घरात ड्रग्ज सापडल्यानंतर करिश्मा प्रकाश हिच्यावर तत्काळ गुन्हाही दाखल करण्यात आला. एनसीबीचे अधिकारी करिश्माच्या घरी गेले तेव्हा ती घरात नव्हती. यानंतर अधिकाऱ्यांनी करिश्माच्या कुटुंबीयांकडे चौकशीसाठीचे समन्स देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हे समन्स स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हे समन्स करिश्मा प्रकाशच्या घराच्या दारावर चिकटवले. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून तिचा शोध सुरु आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा उलगडा झाला होता. यामध्ये दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर अशा अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली होती.

ड्रग्ज चॅट ग्रुपची ‘अ‍ॅडमिन’ दीपिका पदुकोण, मॅनेजरची खळबळजनक कबुली
एनसीबीने 25 सप्टेंबरला करिश्मा प्रकाश हिची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान करिश्मा प्रकाशने अनेक खळबळजनक खुलासे केले होते. दीपिका पदुकोण ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रूपची अ‍ॅडमिन असल्याचे तिने सांगितले होते. दीपिका पदुकोण हिनेदेखील चौकशीदरम्यान ही गोष्ट कबूल केली होती.

संबंधित बातम्या:

दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकूलचे फोन जप्त

Drug Case | दीपिका पदुकोण – मॅनेजर करिश्मा गोव्यात होत्या, सूत्रांची माहिती

Drug Case | दीपिका पदुकोण, मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबीच्या 5 अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी

(Deepika Padukone manager Karishma Prakash fled away)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI