खासगीरित्या ‘रेमडेसिव्हीर’चं वाटप करणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार? याचिकेतील सुधारणेसाठी अर्ज सादर

सुजय विखे-पाटील यांनी दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणून वाटप केलं होतं. त्यावरुन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

खासगीरित्या 'रेमडेसिव्हीर'चं वाटप करणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार? याचिकेतील सुधारणेसाठी अर्ज सादर

मुंबई : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणून वाटप केलं होतं. त्यावरुन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. पुढील सुनावणीच्या दिवशी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात याचिकाकर्त्याकडून याचिकेत सुधारणा करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. (Demand for action against leaders who specifically distribute remedesivir)

खासदार सुजय विखे पाटील यांच्याप्रमाणे अनेक राजकारण्यांनी रेमडेसिव्हीरचं खासगीरित्या वाटप केलंय. त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्याकडून करण्यात आलीय. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 500 रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं वाटप केलंय. माजी आमदार चंद्रकांत रघुवंषी यांनीही 6 हजार रेमडेसिव्हीरचं वाटप केलं. त्याचप्रमाणे आमदार अमरीश पटेल आणि आमदार रोहित पवार यांनीही खासगीरित्या रेमडेसिव्हीरचं वाटप केलं. या सर्वांवरही कारवाई करण्याचे आदेश द्यावेत असं याचिकाकर्त्यांनी अर्जात मागणी केली आहे. या प्रकरणात खोटे पेपरही बनवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर फोर्जरी कलमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

सुजय विखेंनी 300 इंजेक्शन आणल्याचा दावा

सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. 300 इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली.

22 एप्रिलला सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. त्यानंतर त्यांनी 24 एप्रिलला म्हणजे दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

रेमडेसिव्हीर आणलेल्या ‘त्या’ खासगी विमानाची माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार ?

Demand for action against leaders who specifically distribute remedesivir

Published On - 10:48 pm, Mon, 3 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI