सचिन वाझेप्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई : अजित पवार

ज्यांच्यापर्यंत हे धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar On Sachin Waze Case)

सचिन वाझेप्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई : अजित पवार
sachin vaze ajit pawar
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 2:14 PM

मुंबई : “सचिन वाझे प्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही,” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Deputy CM Ajit Pawar Comment On Sachin Waze Case)

अजित पवार काय म्हणाले? 

“सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की कोणत्याही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही. NIA आणि ATS  अशा दोन यंत्रणा याप्रकरणी चौकशी करत आहेत. ज्या घटना पुढे येतात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

“महाविकासआघाडीचे सरकार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून केलं आहे. त्यात महाराष्ट्राची कायदा आणि सुवव्यवस्था चांगली असली पाहिजे. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे कारण नाही. कोणकोणत्या पक्षात होतं किंवा नव्हतं हा त्याचा प्रश्न आहे,” असेही अजित पवार म्हणाले.

ज्यांच्यापर्यंत हे धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल

“विरोधी पक्षनेत्यांवर काही चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी संध्याकाळपर्यंत कारवाई करुन अटक केली जाईल, असे सांगितलं होतं. त्यानुसार संध्याकाळी ही कारवाई केली गेली. त्याच पद्धतीने ही कारवाई केली जाईल. यात कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. हीच सरकारची भूमिका आहे. जे कोणी दोषी असतील, ज्यांच्यापर्यंत हे धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

“याबाबत शेवटी कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचं कोणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. शिवसेनेच्या बाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतात. अधिकाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजपर्यंत गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वेळोवेळी त्या त्या पद्धतीचे निर्णय मुख्यमंत्री घेतात,” असेही पवारांनी स्पष्ट केले.

चौकशीत काहीही निष्पन्न होण्याआधी शिक्षा देणं उचित नाही 

“शरद पवार महिना दोन महिन्यानंतर आढावा बैठक घेतात. त्याचपद्धतीने कालची बैठक होती. आजच्या बाबत वेगवेगळ्या चर्चा करत असतो. जी काही चौकशी सुरु आहे. त्या जो दोषी असेल त्याबाबत कारवाई केली जाईल. पण चौकशीत काही निष्पन्न होण्याआधी कोणाला शिक्षा देणं उचित नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते,” असेही अजित पवार म्हणाले.  (Deputy CM Ajit Pawar Comment On Sachin Waze Case)

संबंधित बातम्या : 

सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय

शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं; किरीट सोमय्या यांची मागणी

नितेश राणे-वरुण सरदेसाई वाद पेटला, भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा युवासेनेचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.