AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: एक निर्णय आणि बाळासाहेब, पवारांच्या पंक्तीत फडणवीस, सरकारमध्ये नसूनही सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ फडणवीसांच्या हाती, विषय हार्डय समजून घ्या

सत्ता सोडताना केलेल्या दोन्ही भाषणामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा एखाद्या राजकीय ऋषीप्रमाणे झाली होती. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

Devendra Fadnavis: एक निर्णय आणि बाळासाहेब, पवारांच्या पंक्तीत फडणवीस, सरकारमध्ये नसूनही सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' फडणवीसांच्या हाती, विषय हार्डय समजून घ्या
सरकारमध्ये नसूनही सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' फडणवीसांच्या हातीImage Credit source: tv9
| Updated on: Jun 30, 2022 | 5:49 PM
Share

मुंबई : जिथं सत्तेचा गेम तिथं कशाचाही नसतो नेम असचं काहीसं चित्र हे राज्याच्या राजकारणात दिसून आलं आहे. जिथं सर्वांना वाटत होतं की आता पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे होणार, त्याचं पारडं फिरलं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यात पडली. एवढच काय मी कॅबिनेटमध्येही नसेन हेही (Maharashtra Government Cabinet) फडणवीसांनीच जाहीर करून टाकलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाचं आता कौतुक होत आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर फडणवीसांचं नाव हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या पंक्तीत पोहोचलं आहे. सत्ता सोडताना केलेल्या दोन्ही भाषणामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा एखाद्या राजकीय ऋषीप्रमाणे झाली होती. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे, असेही बोलले जाते.

बाळासाहेब शेवटपर्यंत किंगमेकर राहिले

बाळासाहेब ठाकरे हे राज्याच्या राजकारणात नेहमी किंगमेकरच राहिले. त्यांनी कधीही कोणतेही राजकीय पद हे भूषवलं नाही. मात्र शिवसेनेचं सरकार हे नेमही त्यांच्या शब्दांवर हलायचं. बाळासाहेबांचा आदेश हे नेहमी फायनल असायचा. मुख्यमंत्री कुणीही असले तरी राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांचं राजकीय वजन मोठं राहिलं आहे. तसेच चित्र आता फडणवीसांच्या या निर्णयामुळे तयार झालं आहे.

आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल पवारांकडे राहिला

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच भूमिका नंतरच्या काळात दिसून आली. त्याच जोरदार गेल्या अश्यक वाटणारी सत्ता ही पवारांनी खेचून आणली. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करत मोठा मास्टरस्ट्रोक मारला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यानेच महाविकास आघाडी सरकार हे अडीच वर्षे टिकलं असेही बोलले जाते. अन्यथा तेवढा काळही हे सरकार तग धरू शकलं नसतं, असेही अनेक राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळेच पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत सरकारची सुत्रं ही आपल्याकडे ठेवली होती.

मी पुन्हा येईन…ची प्रतिमाही पुसली जाणार

मागच्या निवडणुकीत फडणवीसांचं एक वाक्य सर्वात जास्त गाजलं ते म्हणजे, मी पुन्हा येईन…या वाक्यनं राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घातला होता. यावर अनेक मीम्सही बनत होते.  मी पुन्हा येईन, याही फडणवीसांच्या वक्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तीही टीका आता या निर्णयाने पुसली जाणार आहे

शिंदे सरकारचा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच

आता सरकार जरी एकनाथ शिंदे याचं स्थापन होत असले तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांकडेच असणार आहे. त्यामुळे फडणवीसांचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही सणसणीत उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडेही आता बोलण्यासारखं फार काही नसणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.