AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 15, 2020 | 9:41 PM
Share

मुंबई : आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे (More Than 950 Corona Deaths Hides) पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला (More Than 950 Corona Deaths Hides) आहे.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात फडणवीस म्हणाले, “सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला, तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणं नॉन-कोव्हिड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत.”

आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. असे करुन झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असंही या पत्रात फडणवीस म्हणाले.

आयसीएमआरच्या गाईडलाईन्स (ICMR Rules) डावलून महापालिकेच्या समितीने कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करुन 356 अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणं असे मिळून सुमारे 451 मृत्यू हे कोव्हिड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजे (More Than 950 Corona Deaths Hides).

आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते कोरोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे कोरोना मृत्यू नाहीत. याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे कोरोनाचे मृत्यू कोरोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरुपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विविध रुग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे, अशी सुमारे 500 प्रकरणं आहेत. पण, ती प्रकरणं ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आहेत. पारदर्शिता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे 950 वर मृत्यू हे मुंबईत कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्याची नोंद मात्र अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोना स्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, याची माहिती जनतेला द्यावी आणि असे गैरप्रकार करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .

More Than 950 Corona Deaths Hides

संबंधित बातम्या :

गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?

मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मनसेचा दणका, चुकीचा ‘कोरोना’ रिपोर्ट दिलेल्या महिलेचा खर्च ठाणे महापालिका उचलणार

महाराष्ट्रात खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात, नवी किंमत किती?

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत