अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला?; देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका फॅशन डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही दिली.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला?; देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 2:51 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका फॅशन डिझायनर महिलेने आधी एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर केली. मात्र, अमृता फडणवीस यांनी या महिलेला हुसकावून लावल्यानंतर तिने त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमृता यांनी अखेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. सदस्यांनी प्रश्न उपस्थित करताच फडणवीस यांनी या घटनेची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यासाठी या महिलेने कुंभाड रचलं. तिला आम्हाला ट्रॅप करायचं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात ती आणि तिचे साथीदार पकडले जाणारच होते, पण एफआयआर सार्वजनिक झाल्याने आरोपी पकडण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं ते म्हणाले.

माझ्या पत्नीने या प्रकरणाचा एक एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्यामाध्यमातून काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी आहे. शिकलेली आहे. हुशार आहे. ही मुलगी 2015-16च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं. अचानक 2021मध्ये या मुलीनं माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विश्वास संपादन केला

त्यानंतर तिने मी डिझायनर आहे, असं सांगणं सुरू केलं. मी डिझायनिंगचे कपडे तयार करते. माझा बिझनेस सुरू आहे. मी आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते. आणि त्यासोबत बेस्ट 50 पॉवर फुल वूमनमध्ये माझं नाव आलं आहे, असं तिने सांगितलं. त्यानंतर ती म्हणाली माझी आई वारली. मी तिच्यावर पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही त्याचं प्रकाशन करा. त्यानंतर तिने घरच्या घरी पुस्तकाचं प्रकाशन करून घेतलं. असा विश्वास संपादित करून घेतला. हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिनं येणं जाणं सुरू केलं. कधी म्हणायची माझे डिझायनर क्लोथ वापरा. ती माझ्या पत्नीला डिझायनर कपडे वापरायाल द्यायची. त्यामुळे तिने आमचा अजून विश्वास संपादित केला. ती अजून कपडे घेऊन यायची. आणखी काही गोष्टी घेऊन यायची, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

एक कोटीची ऑफर दिली

हळूच एक दिवस तिने सांगितलं, माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये फसवण्यात आलंय. त्यांना सोडवा. त्यावर माझी पत्नी म्हणाली, तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक. सरकार बदलल्यावर तिने हे सांगितलं. तोपर्यंत ती विश्वास संपादन करत होती. काही दिवसाने तिने सांगितलं की माझे वडील सर्व बुकींना ओळखतात. आम्ही बुकींची माहिती द्यायचो. त्यावरून रेड व्हायची आणि त्यातून आम्हाला पैसे मिळायचे. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड टाकू.

तिचं हे बोलणं माझ्या पत्नीने गांभीर्याने घेतलं नाही. तिला सांगितलं या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. आम्ही या फालतू गोष्टीत पडणार नाही. तिने हा धंदा केला तर फायदा होईल असं सांगितलं. माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी देईल. त्यांची सुटका करा, अशीही ती म्हणाली, असं फडणवीस म्हणाले.

पत्नीने खडसावलं

तुझे वडील चुकीच्या गोष्टीत नसतील तर ते कायदेशीर मार्गाने सुटतील. असतील तर सुटणार नाहीत, असं माझ्या पत्नीने तिला सांगितलं. बुकीचा विषय यायला लागल्यावर माझ्या पत्नीने तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर तिने अनोळखी नंबरवरून मेसेज आणि व्हिडीओ पाठवले. त्यात काही फालतूचं संभाषण होतं. काही व्हिडीओत हार घालते आणि अंगठी घालते असं दिसतं आणि ते परतही घेताना दिसते.

एका व्हिडीओत ती बॅगेत पैसे भरताना दिसते. त्यानंतर तशीच बॅग आमच्या मोलकरणीला देताना दिसते. या बॅगेत कपडे असल्याचंही दिसतं. त्यानंतर तिने पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पत्नीने मला सांगितल्यावर मी पोलिसांना बोलावलं आणि एफआयआर दाखल केला, अशी माहितीही त्यांनी दिली.

एफआयआर आला आणि…

कोणताही एफआयआर जास्त दिवस लपून राहत नाही. दोन दिवसानंतर तो कोर्टात द्यावा लागतो. त्यामुळे हा एफआयआर सार्वजनिक झाला. एका वर्तमानपत्राने त्याची बातमी केली. एफआयआर बाहेर आला नसता तर आम्ही आरोपींना पकडण्यात यशस्वी झालो असतो. कारण पोलिसांनी सागितलं आपण त्यांना एंगेज करू. त्यानंतर आरोपीने एका संभाषणात आपण चुकीने हे केल्याचंही कबूल केलं. आमच्यावरच्या केसेस मागे घेण्यासाठी हे केल्याचं त्यांनी सांगितलं, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली

मागच्या सरकारने माझ्या वडिलांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण सरकार बदलल्याने ती प्रक्रिया थांबली. तुम्ही ते बंद केलं. म्हणून आम्हाला तुम्हाला ब्लॅकमेल करावं लागलं, असं या मुलीने सांगितलं. हे सांगताना त्यांनी काही बड्या नेत्यांची नावं घेतली. मी ती नावं घेणार नाही. मला राजकारण करायचं नाही. कारण अशा आरोपींवर किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे. पण प्रकरण गंभीर आहे. हे कुणाही बाबतीत घडू शकतं, असं फडणवीस म्हणाले.

या आरोपींनी काही व्हिडीओ पाठवले. राजकीय नेत्यांसोबतचे आमचे कसे संबंध आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी हे व्हिडीओ पाठवले. आमचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत ओळख आहे. तुम्ही मदत नाही केली तर आम्ही त्यांना ही माहिती देऊ, अशी ब्लॅकमेलिंग त्यांनी सुरू केली. आम्हाला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न होता, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.