AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना भाजपने खरोखरच ऑफर दिलीय?, संजय राऊत यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ठाकरे गटाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जाणून घ्या.

उद्धव ठाकरेंना भाजपने खरोखरच ऑफर दिलीय?, संजय राऊत यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
| Updated on: Mar 01, 2024 | 6:27 PM
Share

मुंबई : टीव्ही9 मराठीच्या ‘लोकसभा महासंग्राम’ या विशेष या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. यादरम्यान उद्धव ठाकरेंना भाजपने खरोखरच ऑफर दिल्याचा दावा याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना राऊत बेशुद्ध आहेत. शुद्ध आली नसल्याचं म्हणत दावा फेटाळून लावला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अजुही राऊत बेशुद्ध आहेत. शुद्ध आली नाही. अजूनही त्यांना भास होतात. अजूनही असे स्वप्न पडतात. आश्चर्यच आहे हो. एक तर बघा आमच्याकडे दिल्लीत जाळं घेऊन फिरणारे नेते नाहीत. राज्यातील काही विषय असेल तर मला विचारलं जातं. अजून दिल्लीत माझी पत आहे. उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं आहे का असं मला अजूनही विचारलं गेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारंचं जाळं टाकण्यात आलं आहे, असं स्वप्न संजय राऊत यांना पडलं असलं तरी मला वस्तुस्थिती वाटत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

बाळासाहेबांवर जो विश्वास होता, तो जनतेने उद्धव ठाकरेंवर टाकला होता.  ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशीच विश्वास उडाला. मतभेद संपवता येतात. मनभेद संपवणं कठिण असतात. जीवनात मतभेद झाले तर तो विषय बाजूला ठेवून काम करता येतं. पण मनभेद झाले तर काम करता येत नाही. रोज मोदींवर त्यांनी टीका केली. आमच्यावर टीका केली. टार्गेट केलं. या सर्व गोष्टींमुळे मनभेद झाल्याचं फडणवीस म्हणाले.

मनसेला सोबत घेणार का?

आमचे संबंध राज ठाकरेंशी आहेतच. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका मान्य. त्यांची भूमिका व्यापक नव्हती, क्षेत्रीय अस्मिता अडचणीची नाही. क्षेत्रीय अस्मिता असली पाहिजे. पण प्रांतवाद म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असं नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला नाही. त्यांचे आमचे विचार जुळत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आमची युती होणार आहे. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा अशी स्थिती यायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.