VIDEO: अब्दुल सत्तारांचं युतीबाबत मोठं विधान, देवेंद्र फडणवीस म्हणतात, नया है वह!

VIDEO: अब्दुल सत्तारांचं युतीबाबत मोठं विधान, देवेंद्र फडणवीस म्हणतात, नया है वह!
devendra fadnavis

शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत केलेल्या विधानाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे.

समीर भिसे

| Edited By: भीमराव गवळी

Jan 05, 2022 | 6:17 PM

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत केलेल्या विधानाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. नया है वह, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांचं म्हणणं उडवून लावलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना अब्दुल सत्तार यांच्या विधानाबाबत छेडण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. ते युती घडवून आणू शकतात असं सत्तारांना वाटतं याचा मला अतिशय आनंद आहे. पण अब्दुल सत्तार नया है वह. त्यांना काय माहीत आहे शिवसेना. काहीच माहीत नाही सेनेचं. मला तर असं वाटतं की, गेल्या पाच सात महिन्यात ते कधी उद्धवजींनाही भेटले नसतील. युतीबाबत बोलायला कोणी महत्त्वाचा माणूस लागतो ना, असं फडणवीस म्हणाले.

भाजपची तुकडी उत्तर प्रदेशाला रवाना

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तुकडी बुधवारी उत्तर प्रदेशला रवाना झाली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला. आ. राहुल नार्वेकर, आ. राजाभाऊ राऊत, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय पाण्डेय आदी या प्रसंगी उपस्थित होते.

वेगवेगळया राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते पाठविण्याची अनेक वर्षांपासूनची पद्धत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठीही अन्य राज्यांतून कार्यकर्ते येत असतात. उत्तर प्रदेशला जाणारे कार्यकर्ते आपल्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे हे कार्यकर्ते 54 विधानसभा मतदारसंघातील प्रचारात सहभागी होतील. मोर्चाचे 500 अनिवासी भारतीय कार्यकर्तेही प्रचारात सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ . संजय पाण्डेय यांनी दिली. उत्तर भारतीय मोर्चाचे संतोष सिंग, प्रद्युम्न शुक्ल, अनिल राय आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तर कुलगुरुपदाचा लिलाव होईल

या आधी फडणवीसांनी युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा कायदा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. भाजप सरकारच्या कार्यकाळातकेलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले होते. मी तमिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरूंच्या निवडीसाठी दहा कोटी घेतले जात. भाजपा सरकारच्या कार्यकाळात आम्ही केलेला विद्यापीठ कायदा जसाच्या तसा तामिळनाडू सरकारने लागू केला. मात्र, आता तोच कायदा बदलला असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुलगुरू पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

संबंधित बातम्या:

‘पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं’, काँग्रेसचा पलटवार, सुरजेवालांनी व्हिडीओही दाखवला!

‘विकासविरोधी असल्याचं काँग्रेसनं दाखवून दिलं’, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर भाजपाध्यक्षांचा घणाघात

Sindhutai sakpal : सिंधुताईंनंतर अनाथांची माय कोण?; ममता सपकाळ चालवणार वारसा?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें