Eknath Shinde : ‘देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे, एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आमच्यासोबत आहेत’, एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक

भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला असून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असल्याचेही त्यांनी भावना व्यक्त केली.

Eknath Shinde : 'देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे, एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आमच्यासोबत आहेत', एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक
मुख्यमंत्रीपदासाठी इतका प्रवास का करावा लागला? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 5:45 PM

मुंबई: बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) बंडखोरी नाट्याचा शेवटचा अंक शेवटाकडे जात असतानाच, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव जाहीर झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी मंत्रीमंडळाच्या बाहेर राहिन. त्यानंतर बंडखोर आणि भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्यानंतर माध्यमांशी भावी मुख्यमंत्री म्हणून बोलताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल गौरवोद्गगार काढताना सांगितले की, 120 चा आकडा भाजपकडे असतानाही त्यांनी मुख्यमंत्रीपद संख्याबळानुसार भाजपही घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, मनाचा मोठेपणा दाखवला असे म्हणत त्यांच्याबद्दल गौरवोद्गगार काढले.

…म्हणून बंडखोरी केली

भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित चाललेल्या पत्रकार परिषदेत आपण बंडखोरी का केली हे सांगितलेच. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत काम करताना होत असणारी घुसमट सांगितली.

आमदारांची कामं झाली नाहीत

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, माझी कामं होत असली तरी, बरोबरच्या आमदारांची कामं होत नसल्यानेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांची उदात्तता

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संख्याबळ असतानाही त्यांनी आपण मुख्यमंत्री न होता, त्यांनी एका शिवसैनिकाल मुख्यमंत्री केले आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा  असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांना आपण एक चांगले सरकार देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा

यावेळी भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला असून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असल्याचेही त्यांनी भावना व्यक्त केली.

 ऐतिहासिक घटना

यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, ही ऐतिहासिक घटना असल्याचेही मत व्यक्त करत कुणाला मंत्रिपद पाहिजे असं नाही, मात्र यावेळी कुठलीही अपेक्षा केली नव्हती, पण जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर सगळ्यांसमोर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.