AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंजारा समाजाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांची जोरदार बॅटिंग

आपलं सरकार राज्यात होतं. पोहरादेवीला मोठं काम केलं.

बंजारा समाजाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांची जोरदार बॅटिंग
बंजारा समाजाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांची जोरदार बॅटिंगImage Credit source: tv 9
| Updated on: Oct 16, 2022 | 9:47 PM
Share

संदेश शिर्के, TV9 मराठी, प्रतिनिधी, ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, बंजारा समाजासोबत आहोत. शंकर पवार, संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी निमंत्रित केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्रीही येणार आहेत. मी ट्रेलर म्हणून काम करतो. पिक्चर मुख्यमंत्री आल्यावर सुरू होणार आहे. आपला समाज सिंधू संस्कृतीशी नातं सांगणार बंजारा समाज आहे. पर्यावरण पूरक, छोटा-मोठा व्यापार करायचा. टॅटूचे खरे जनक आमचे बंजारा आहे. साप-विंचू यावरील औषधाचं ज्ञान बंजारा समाजाकडं आहे. बंजारा कला, संस्कृती, कला, नृत्यू, गायन या सर्वांचं वेगळेपण ठेवून आहे.

देशात राष्ट्रीय महामार्ग हे जुन्या मार्गावरून झालेत. बंजारा समाज पशूंसह फिरायचे त्या मार्गांवर राष्ट्रीय मार्ग तयार झाले आहेत.

जुन्या मार्गावर बाऊडी तयार करायचा. या बाऊडी बंजारा समाजानं केल्या आहेत. इंग्रजांशी लढाई केली. त्यात इंग्रजांनी अपराधिेक समाज म्हणून घोषित केलं. त्यात बंजारा समाज होता. सेवालाल महाराजांच्या रुपानं बंजारा समाजाचं संघटन तयार झालं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, रामराव बाजूंची आठवण येतो. बापूंचं आमच्यावर प्रेम होतं. बापूंची व्यवस्था करायचो. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही संबंध होते.

आपलं सरकार राज्यात होतं. पोहरादेवीला मोठं काम केलं. पोहरादेवीला जागतिक वारसा स्थळ तयार करण्याचा प्रयत्न केला. संजय राठोड यांनी मागणी केली. मी 100 कोटी रुपये तात्काळ मंजूर केले.

काम सुरू झालं. पण, दुर्दैवानं अडीच वर्षात एक नवा पैसा मिळाला नाही. आता शिंदे साहेब तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं पोहरादेवीला एक नवा पैसा कमी पडू देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.