AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणांना टीसीनं पकडलं… ओमराजे निंबाळकरांना फोन, मग पुढं झालं काय? ऑडिओ क्लिप व्हायरल

Omraje Nimbalkar TTE in Pune Station : धाराशिवच्या दोन तरुणांना पुणे रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीसांनी पकडले. त्यानंतर त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन केला. याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

तरुणांना टीसीनं पकडलं... ओमराजे निंबाळकरांना फोन, मग पुढं झालं काय? ऑडिओ क्लिप व्हायरल
ओमराजे निंबाळकरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 9:52 PM
Share

आमदार, खासदार म्हटलं की कोण केव्हा काय मागणी करेल काही सांगता येत नाही. लोकप्रतिनिधींना अनेकदा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. पोलिसांपासून ते अनेक गंभीर प्रकरणात मध्यस्थी करण्याची वेळ येते. तर दूर प्रदेशात अडकलेल्या कार्यकर्त्यांची सुटकाही करावी लागते. त्याचा काही लोक गैरफायदाही घेतात. तर काही खरंच अडलेले नडलेले असतात. त्यांना मदत करावी लागते. असाच काहीसा अनुभव धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना आला. मतदारसंघातील तरुणांना त्यांनी मदत केली. याविषयीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

पुणे रेल्वे स्टेशनवर काय घडलं?

पुणे रेल्वे स्टेशनवर धाराशिवच्या दोन युवकांना तिकीट चेकरने (टीसीने) पकडले. टीसीने त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली. अर्थातच त्यांच्याकडे तिकीट नव्हते. रेल्वे स्टेशनवर धाराशिव जिल्ह्यातील दोन युवकांना चेकरने पकडल्यानंतर त्यांच्याकडून दंडाची पावती फाडण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांनी मग थेट मोबाईलवरून खासदार ओमराजे निंबाळकरांकडे मदत मागितली. या दोन तरुण आणि खासदार निंबाळकर यांच्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे.

मी साहेब नाही, खासदार आहे

या दोन तरुणांकडे तिकीट नव्हते. त्यांनी मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. फोनवर तुम्ही आमचे साहेब आहात असं संबंधित व्यक्तीने म्हटल्यानंतर ओमराजेंनी त्याला मी साहेब नाही, खासदार आहे, असं थेट उत्तर दिलं. तिकीट तपासनीसाने त्यांना सगळी हकिगत कथन केली. तसेच ही चार माणसं असल्याचे आणि दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले.

सर्व परिस्थिती लक्षात आल्यानंतर निंबाळकर यांनी क्षणाचाही विचार न करता युवकांना सोडण्यासाठी लागणारे पैसे देण्याची तयारी दाखवली. इतक्यावरच न थांबता टीसीला, तुमचा फोन-पे नंबर पाठवा, मी पैसे पाठवतो. त्या मुलांना सोडून द्या, असे सांगितले. हा संवाद ही ऑडिओ क्लिपमध्ये स्पषपणे ऐकू येत आहे. या संपूर्ण संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, खासदार ओमराजेंच्या मदतीची चर्चा सुरू झाली आहे. तर या मुलांवरही काही जणांनी टीका केली आहे. मोबाईलवर टॉकटाईम आहे, इंटरनेट आहे. पण रेल्वेचं तिकीट काढायला पैसे नाहीत, असा सूर नेटकऱ्यांनी आळवला. तर निंबाळकरांनी तरुणांना मदत केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. निंबाळकर यांनी नुकतेच उद्धव सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती