AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane: ‘आय लव्ह मोहम्मद नाही… ‘ नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले हिरव्या सापांचे…

Nitesh Rane on I Love Mohammad: अंधेरीतील कावड यात्रेच्या निमित्ताने मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद पेटला आहे.आम्ही इथे सण साजरे करणार नाही तर काय पाकिस्तानात करणार, असा सवालही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.

Nitesh Rane: 'आय लव्ह मोहम्मद नाही... ' नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले हिरव्या सापांचे...
नितेश राणेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 23, 2026 | 9:05 PM
Share

अंधेरीतील कावड यात्रेच्या अवसरावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हिंदुत्ववादी विधान केले आहे. कावड यात्रा काही वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणात निघत होती, मात्र आता हिंदू रक्षक सेनेने ती भव्य करण्याचा निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले. हा देश हिंदू राष्ट्र आहे, मुंबई, महाराष्ट्र ही महादेवाची भूमी आहे, त्यामुळे हिंदूंचा प्रत्येक सण मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. ही हिंदुत्ववादी विचारांची सरकार आहे, आम्ही इथे सण साजरे करणार नाही तर काय पाकिस्तानात करणार, असा सवालही त्यांनी केला. आज सर्व भगवाधारी सत्ता आणि मंत्रालयात बसले आहेत, मुंबईत I LOVE मोहम्मद नाही तर I LOVE महादेवच चालेल, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा नवीन वाद ओढवला आहे. तर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत पडलं आहे.

हिरव्या सापांना…

`राज्यात आणि मुंबईत हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री आणि महापौर आहे, त्यामुळे हिंदुत्वाच्या उत्साहात सर्वात जास्त आहे. ही भगवा आणि I Love महादेववाल्यांची मुंबई आहे. मत्स्य आणि बंदर मंत्र्याबरोबर हिरव्या सापांच्या संगोपनाचे मंत्रालय माझ्याकडेच आहे, म्हणून त्यांनी त्रिशूळ मला दिला. `त्रिशूळ वापरण्यामध्ये मी PhD केली आहे, जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्याच्या विरोधात वापरण्यासाठी हिंदू म्हणून त्रिशूळ माझ्या हातात दिला आहे, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

राहुल गांधी, संजय राऊतांवर टीका

राहुल गांधींचा तुम्ही पुण्याचा कार्यक्रम बघितला तर मला कळत नाही त्यांनी ग्राऊंडवर का कार्यक्रम घेतला. यापेक्षा डी. वाय. पाटील किंवा भारती विद्यापीठात कार्यक्रम घेतला असता. सगळ्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने आणून समोर उभे केले होते, इन्फ्लुएन्सरला पैसे देत होते राहुल गांधीबद्दल चांगले बोला म्हणून असा आरोप त्यांनी केला. आज मुख्यमंत्री साहेबांचा जो कार्यक्रम होता तिथे खरी तरुणाई दिसली. महाविकास आघाडीवाल्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बघून शिकावे की Gen Z शी संवाद काय असतो, अशी टीका ही त्यांनी केली. तर आमदार आदित्य ठाकरे यांच्या तिंरगा आंदोलनावरही त्यांनी टीका केली. हे सगळे त्यांचेच पाप आहे, आम्ही उलट त्यांचे पाप धुण्याचे काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय. ही सगळी मैदाने अगोदर त्यांनी नाईट लाईफ गँगला दिली होती, आम्ही उलट सगळे नीट करण्याचे काम करतोय, असा दावा त्यांनी केला.

Follow Us
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता